झारखंड मुक्ति मोर्चा
झारखंड मुक्ति मोर्चा | |
---|---|
पक्षाध्यक्ष | शिबू सोरेन |
स्थापना | १९७२ |
मुख्यालय | रांची |
लोकसभेमधील जागा | २ / ५४५ |
विधानसभेमधील जागा | ३० / ८१ |
राजकीय तत्त्वे | प्रादेशिक |
संकेतस्थळ | jharkhandmuktimorcha.org |
झारखंड मुक्ति मोर्चा (संक्षेप: जे.एम.एम.) हा एक भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. बिरसा मुंडा ह्या अदिवासी योद्ध्याच्या जन्मदिनादिवशी १९७२ साली झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली गेली. झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यात झारखंड मुक्ती मोर्चाचा मोठा सहभाग होता.
परंतु राजकारणापेक्षा गुन्हेगारांना आश्रय देणारा पक्ष अशी झारखंड मुक्ती मोर्चाची कुप्रसिद्धी झाली आहे. पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष शिबू सोरेन ह्यांच्यावर खून, अपहरण इत्यदी अनेक आरोप असून केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना कोर्टाने दोषी ठरवले गेलेले सोरेन हे आजवरचे एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याचबरोबर २००९ सालच्या निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाकडून तिकिट मिळालेल्या सर्व उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी दाखले नोंदवले गेले होते.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झामुमोला केवळ २ जागांवर विजय मिळाला तर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत सोरेन ह्याच्या नेतृत्वाखालील झामुमोला ८२ पैकी १९ जागांवर विजय मिळवता आला. २०१९-२० च्या निवडणुकीत या पक्षाने ८१ पैकी ३० जागा जिंकल्या.