झाखरटोर्ट
झाखर टोर्टं हा एक प्रकारचा केक आहे. एकोणिसाव्या शतकात ऑस्ट्रियात फ्रांझ झाखर या स्वयंपाक्याने झाखर टोर्टं पहिल्यांदा बनवला. झाखर टोर्टं मध्य युरोपात लोकप्रिय आहे. हा केक घट्ट चॉकलेट केकवर जरदाळूच्या जॅमचा बारीक थर आणि त्यावर गडद चॉकलेटचे आइसिंग घालून केला जातो. हा केक सहसा व्हिप्ड क्रीमसह खाल्ला जातो.