Jump to content

झपाटलेला २

झपाटलेला २ हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलेला सन २०१३ मधील मराठी चित्रपट आहे.

झपाटलेला २
दिग्दर्शनमहेश कोठारे
कथामहेश कोठारे
प्रमुख कलाकारआदिनाथ कोठारे
मकरंद अनासपुरे
सई ताम्हणकर
सोनाली कुलकर्णी
संवाद अशोक पाटोळे, प्रशांत विचारे
भाषामराठी
प्रदर्शित ७ जून २०१३
एकूण उत्पन्न११ कोटी (US$२.४४ दशलक्ष)[]


पार्श्वभूमी

१९९३ साली मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. अनोखी संकल्पना, वेगवान कथा-दिग्दर्शन, त्याला रहस्याची फोडणी, लक्ष्याची धमाल आणि खलनायक तात्या विंचूच्या कायवाया, यामुळे ‘झपाटलेला’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमाला रिलीज होऊन आता २० वर्षे उलटून गेली आहेत. इन्स्पेक्टर महेश जाधवच्या गोळीला बळी पडलेला आणि मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूलाही आवाहन देणारा खलनायक तात्या विंचू परत आता 'झपाटलेला २ ' या नावाने याच संकल्पनेवर महेश कोठारे घेऊन आले आहेत 'झपाटलेला २ ' हा सिनेमा.या सिनेमातून ‘तात्या विंचू’ आणि त्याचा बोलका बाहुला घडविणारे ‘शब्दभ्रमकार’ रामदास पाध्ये यांची अचंबित करणारी कामगिरी यात आहे.सिलेक्ट मिडीया होल्डींग्स प्रस्तुत आणि कोठारे ॲन्ड कोठारे व्हिजन निर्मित ‘झपाटलेला २ ’ हा पहिला मराठी सिनेमा थ्रीडी(3 D) चित्रपट ७ जून २०१३ रोजी प्रदर्शित झाला.[]

कलाकार

कथानक

संदर्भ

  1. ^ "गुड बाय २०१३ - कसं गेलं मराठी चित्रपट सृष्टीचं वर्ष". 12 February 2014 रोजी पाहिले.
  2. ^ दैनिक भास्कर दि. ३० एप्रिल २०१३{http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-TOP-first-look-of-zapatlela-2-marathi-film-4250550-NOR.html}[permanent dead link]

बाह्य दुवे