Jump to content

ज्युलियस सीझर (नाटक)

Julio César (es); Julius Caesar (hu); 凱撒大帝 (zh-hk); 凯撒大帝 (zh-hans); Julio Zesar (antzezlana) (eu); جولیئس سیزر (pnb); جولیس سیزر (ڈرامہ) (ur); Юлий Цезарь (ru); Julius Caesar (nl); Julius Cäsar (de); Julius Caesar (cs); Julius Caesar (ga); Հուլիոս Կեսար (hy); 凱撒大帝 (zh); Julius Caesar (da); Julius Caesar (tr); ジュリアス・シーザー (ja); Julius Caesar (ludo) (ia); Julius Caesar (sh); Julius Caesar (sk); Iulius Caesar (ro); Юлій Цезар (uk); Iulius Caesar (la); 凱撒大帝 (zh-hant); जुलियस सीजर (नाटक) (hi); جولئیس قیصر (skr); 줄리어스 시저 (ko); ജൂലിയസ് സീസർ (ml); Julio Cezaro (eo); Јулиј Цезар (драма) (mk); ஜூலியஸ் சீசர் (நாடகம்) (ta); जूलियस सीज़र (नाटक) (bho); জুলিয়াস সিজার (bn); Jules César (fr); ژولیوس سزار (fa); 凯撒大帝 (zh-cn); जुलियस सिजर (नाटक) (ne); Juli Cèsar (ca); Julius Caesar (fi); Julius Caesar (sv); ज्युलियस सीझर (नाटक) (mr); Јулије Цезар (sr); Julius Caesar (pt); Ġulju Ċesri (mt); Jūlijs Cēzars (lv); Julius Caesar (fy); Julijus Cezaris (drama) (lt); Julij Cezar (sl); ਜੂਲੀਅਸ ਸੀਜ਼ਰ (pa); Julius Caesar (ms); 凯撒大帝 (zh-sg); Julius Caesar (id); Juliusz Cezar (pl); Julius Cæsar (nb); 凱撒大帝 (zh-tw); Giulio Cesare (it); Julije Cezar (bs); ಜೂಲಿಯಸ್ ಸೀಸರ್ (kn); Julius Caesar (cy); Julius Caesar (en); يوليوس قيصر (ar); Ιούλιος Καίσαρας (el); יוליוס קיסר (he) obra de teatro de William Shakespeare (es); William Shakespeare tragédiája (hu); obra de teatre de William Shakespeare (ca); play by William Shakespeare (en); Tragödie von William Shakespeare (de); traġedja ta' William Shakespeare (mt); drama (lv); Shakespeare'in beş perdelik bir trajedisi (tr); tragédie Williama Shakespeara (cs); трагедия Шекспира (ru); מחזה מאת וויליאם שייקספיר (he); pjäs av William Shakespeare (sv); sztuka teatralna (autor: William Shakespeare) (pl); skuespill av William Shakespeare (nb); toneelstuk (nl); pièce de théâtre de William Shakespeare (fr); tragedia di William Shakespeare (it); tragedie de William Shakespeare (ro); ਵਿਲੀਅਮ ਸ਼ੇਕਸਪੀਅਰ ਦਾ ਨਾਟਕ (pa); play by William Shakespeare (en); teatraĵo far Vilhelmo Ŝekspiro (eo); θεατρικό έργο του Ουίλλιαμ Σαίξπηρ (el); tragedija Williama Shakespeara (1599) (sl) Julius Caesar, The Tragedy of Julius Caesar (sl); Julius Cæsar (sv); Ook gij, Julius Caesar (toneelstuk) (nl); Julius Caesar play (ml); Julije Cezar (sh); 儒略·愷撒, 朱利叶斯·凯撒 (zh); Julio Cesar, Popilius Lena, Julio César (Shakespeare) (es); Julius Caesar (de); 율리우스 카이사르 (ko); The Tragedy of Julius Caesar, Tragedy of Julius Caesar (en); La Tragedio de Julio Cezaro (eo); Η τραγωδία του Ιούλιου Καίσαρα (el); Julius Caesar (nb)
ज्युलियस सीझर (नाटक) 
play by William Shakespeare
Cæsars spøkelse hjemsøker Brutus om hans påfølgende nederlag. Gravering på kobberplate av Edward Scriven fra maleri av Richard Westall: London, 1802.)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनाटक
गट-प्रकार
लेखक
वापरलेली भाषा
स्थापना
  • इ.स. १५९९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

द ट्रॅजेडी ऑफ ज्युलियस सीझर (प्रथम फोलिओतील शीर्षक: द ट्रॅजेडी ऑफ इव्हलिव्हस सीझर ), ज्याला ज्युलियस सीझर असे संक्षेपित केले जाते, हे विल्यम शेक्सपियरने १५९९ मध्ये प्रथम सादर केलेले एतिहासीक नाटक आणि शोकांतिका आहे.

नाटकात, ब्रुटस हा कॅसियसच्या नेतृत्वाखालील कटात सामील होतो जेज्युलियस सीझरची हत्या करण्यासाठी आहे ज्याने त्याच्या जुलमी साम्राज्याचा अंत होइल. सीझरच्या खास माणूस अँटनी हा सीझरच्या विरुधकांसोबत शत्रुत्व निर्माण करतो आणि पुर्ण रोम नाट्यमय गृहयुद्धात अडकते. मुळात हे राजकीय नाटक आहे. त्यात स्त्री पात्रांना फारसे महत्त्व नाही, पण तरीही अनेक पात्रांसह हे एक आकर्षक नाटक रचले आहे. यामध्ये राज्य, जनता आणि स्वातंत्र्याच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.

दुसऱ्या शतकाची सुरुवातीला प्लूटार्कने पॅरेलल लाइव्हज या पुस्तकात प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहीली. १५७९ मध्ये थॉमस नॉर्थने प्लुटार्कच्या या पुस्तकाचे इंग्रजी अनुवादा केले. शेक्सपियरचे हे नाटक ह्या अनुवादीत पुस्तकावर आधारीत आहे.[] नाटकीय हेतूंसाठी, शेक्सपियरने प्लुटार्कच्या कथांपेक्षा नाटकात बदल करण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे.[][] नाटकाचे पाच अंक आहेत.

सारांश

नाटकाच्या सुरुवातीला रोममधील सामान्य लोक ज्युलियस सीझरच्या विजयी पुनरागमनाचा आनंद साजरा करत आहे. लुपरकलच्या मेजवानीच्या वेळी, सीझर विजयी परेड आयोजित करतो आणि एक ज्योतिषी त्याला " मार्च महिन्याच्या आयडेस (१३ किंवा १५ तारीख) पासून सावध रहा" असा इशारा देतो, ज्याकडे तो दुर्लक्ष करतो.

दरम्यान, कॅसियस हा ब्रुटसला सीझरच्या हत्येच्या कटात सामील होण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करतो. हत्येच्या दिवशी, सीझरने त्याची पत्नी कॅलफुर्नियाच्या आग्रहाने घरी राहण्याची योजना आखली असते. ब्रुटस त्याला सिनेटमध्ये जाण्यास प्रवृत्त करतो. सिनेटमध्ये, कटकारस्थानी सीझरला भोसकून ठार मारतात. अँटनी रोमच्या नागरिकांना त्यांच्या विरोधात वळविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या भाषणाचा वापर करतो. अँटनी ऑक्टाव्हियस सीझरबरोबर सैन्यात सामील होताना ब्रुटस आणि कॅसियस पळून जातात.

त्यांच्या सैन्यासह तळ ठोकून, ब्रुटस आणि कॅसियस भांडण करतात, नंतर अँटनी आणि ऑक्टेव्हियसवर कूच करण्यास सहमती देतात. त्यानंतरच्या लढाईत, कॅसियस, चुकीच्या बातम्यांमुळे दिशाभूल होऊन, एका गुलामाला त्याला मारण्यासाठी सांगतो. ब्रुटसच्या सैन्याचा देखील पराभव होतो व ब्रुटस आत्महत्या करतो. त्यानंतर अँटोनी आणि ऑक्टेव्हियस यांच्यातील घर्षणाचा एक छोटासा इशारा आहे जो शेक्सपियरच्या अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा ह्या नाटकाची सुरुवात दाखवतो.

रुपांतर

या नाटकावर तीन मुख्य चित्रपट बनले आहेत. १९५० च्या एका चित्रपटात चार्लटन हेस्टनने मार्क अँटोनीची भूमिका केली होती. १९५३ च्या चित्रपटात जेम्स मेसनने ब्रुटस आणि मार्लन ब्रँडोने अँटोनीची भूमिका केली होती. १९७० च्या चित्रपटात जेसन रॉबर्ड्सने ब्रुटसची भूमिका केली, चार्लटन हेस्टनने पुन्हा अँटोनीची भूमिका केली आणि जॉन गिलगुडने सीझरची भूमिका केली होती.[][] २०१६ मध्ये, सृजित मुखर्जीचा बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट जुल्फिकार प्रदर्शित झाला जो ज्युलियस सीझर आणि अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा या दोन्ही नाटकांचे रूपांतर होते. ह्यात परमब्रत चॅटर्जीने अँटोनीची भूमिका केली होती.[]

गुथरी थिएटर आणि द ॲक्टिंग कंपनी द्वारे ज्युलियस सीझरची २०१२ ची निर्मिती मध्ये सीझरला एका कृष्णवर्णीय अभिनेत्याने साकारले होते जे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सुचक होते. हे नाट्क विशेष विवादास्पद नव्हते.[] तथापि २०१७ मध्ये, न्यू यॉर्कच्या शेक्सपियर इन द पार्कमधील नाटकाचे आधुनिक रूपांतर मध्ये सीझरला तत्कालीन अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेसह चित्रित केले होते आणि त्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता.[][]

संदर्भ

  1. ^ "North's translation of Plutarch's Lives" Archived 18 January 2017 at the Wayback Machine., British Library
  2. ^ Shakespeare, William (1999). Arthur Humphreys (ed.). Julius Caesar. Oxford University Press. p. 8. ISBN 0-19-283606-4.
  3. ^ Pages from Plutarch, Shakespeare's Source for Julius Caesar.
  4. ^ Shakespeare and the Moving Image: The Plays on Film and Television (eds. Anthony Davies & Stanley Wells: Cambridge University Press, 1994), pp. 29–31.
  5. ^ Maria Wyke, Caesar in the USA (University of California Press, 2012), p. 60.
  6. ^ Anindita Acharya, My film Zulfiqar is a tribute to The Godfather, says Srijit Mukherji, Hindustan Times (20 September 2016).
  7. ^ Peter Marks, When 'Julius Caesar' was given a Trumpian makeover, people lost it. But is it any good, Washington Post (16 June 2017).
  8. ^ "Delta and Bank of America boycott 'Julius Caesar' play starring Trump-like character". The Guardian. 12 June 2017. 17 June 2017 रोजी पाहिले.
  9. ^ Alexander, Harriet (12 June 2017). "Central Park play depicting Julius Caesar as Donald Trump causes theatre sponsors to withdraw". The Telegraph. 12 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 June 2017 रोजी पाहिले.