ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम
ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम | |
---|---|
स्थान | मिलान, इटली |
उद्घाटन | १९ सप्टेंबर १९२६ |
पुनर्बांधणी | १९५६, १९८९ |
आसन क्षमता | ८०,०१८ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
ए.सी. मिलान इंटर मिलान |
ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम (इटालियन: Stadio Giuseppe Meazza) किंवा सान सिरो हे इटली देशाच्या मिलान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. प्रसिद्ध इटालियन फुटबॉल खेळाडू ज्युझेप्पे मेआत्सा ह्याचे नाव ह्या स्टेडियमला देण्यात आले आहे. मिलान शहरामधील ए.सी. मिलान व इंटर मिलान ह्या दोन्ही लोकप्रिय क्लबांचे हेच यजमान स्थान आहे.
आजवर येथे १९३४ व १९९० फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८० स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९६५, १९७०, १९७४ व २००१ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत