ज्यां-जाक रूसो
जिन-जाक-रूसो | |
---|---|
जन्म | २८ जून १७१२ जिनिव्हा, जिनिव्हाचे प्रजासत्ताक |
मृत्यू | २ जुलै, १७७८ (वय ६६) एर्मेनोनव्हिल, वाझ, फ्रान्स |
ख्याती | तत्त्ववेत्ता |
स्वाक्षरी |
जिन-जाक-रूसो (फ्रेंच: Jean-Jacques Rousseau; २८ जून, इ.स. १७१२ जिनिव्हा, जिनिव्हाचे प्रजासत्ताक - २ जुलै, इ.स. १७७८) हा एक फ्रेंच लेखक, संगीतकार व तत्त्वज्ञ होता. १८व्या शतकामधील एक आघाडीचा राजकीय तत्त्वज्ञ असलेल्या रूसोच्या विचारांचा फ्रेंच क्रांतीवर प्रभाव पडला होता. रूसोने लोकशाहीची स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे घोषित केली होती. हालाखीच्या काळातही रुसोने कमी वयात जगभर प्रवास केला. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिक्षण मिळाले. लोकांना आकर्षीत करण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्याकडे होती.
माणूस हा जन्मतःच स्वतंत्र असतो. परंतु तो अनेक बंधनात जखडलेले आहे. माणूस नैसर्गिक समाजरचनेपासून जितका दूर जाईल तितकी त्याच्यावरील कृत्रिम बंधने वाढत जातात. समाजाला स्वास्थ्य पूर्ण जीवन जगण्यासाठी काही बंधने आवश्यक असतात. ही बंधने समाजाने स्वखुशीने स्वतःवर लादून घेतलेली असतात. याचे अनुशासन करण्याकरिता समाजानेच राज्यव्यवस्था निर्माण केली. राज्यव्यवस्था मानव निर्मित असून तो एक करार आहे. जर राज्य संस्थेने कराराचा भंग केला तर ती राज्य व्यवस्था उलथून पाडण्याचा लोकांना अधिकार आहे. जगप्रसिद्ध पावलेली लोकशाहीची ' स्वातंत्र, समता, बंधुता ' ही तीन तत्त्वे रुसोने घोषित केली होती.
नेपोलियन बोनापार्ट म्हणतो " रूसो जन्मला नसता तर. फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती.
यावरून रुसोच्या तत्त्वज्ञानातील किती मोठी प्रेरणा फ्रेंच क्रांतिकारकांना मिळाली होती हे स्पष्ट होते.
१७व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ जॉन लॉकच्या विचारांनी रूसोला प्रेरणा मिळाली होती. लेखनासोबत रूसोने घड्याळ दुरुस्ती, खासगी चिटणिसगरी केली तसेच अनेक ऑपेरांना संगीत देखील दिले.
ग्रंथ साहित्य
रुसोने लिहिलेले 'एमिल' व 'सामाजिक करार' हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. सामाजिक करार या आपल्या ग्रंथात त्यांनी राजकीय विचार मांडले आहेत. 'डिसकोर्सेस ऑन सायन्स ॲन्ड आर्टस' या निबंधामध्ये रुसो यांनी आधुनिक संस्कृतीवर उघड टीका केली. त्यांच्या मते भौतिक सुख म्हणजे सुख नाही. खरी प्रगती ही नैतिक विकासाशी निगडीत आहे. आधुनिक समाजामध्ये नैतिकतेची जागा असमानता, भ्रष्टाचार, क्रौर्य यांनी घेतलेली आहे. [१]
बाह्य दुवे
- रूसोचे सर्व साहित्य Archived 2016-03-25 at the Wayback Machine.
- व्यक्तिचित्र
- ^ जैन आणि, माथुर (२०११). आधुनिक जगाचा इतिहास १५००- २०००. पुणे: के सागर. pp. ६३.