Jump to content

ज्ञानेश्वर विद्यापीठ

ज्ञानेश्वर विद्यापीठ हे इ.स. १९८० मधील पुण्यात नवी पेठ येथे डाॅ.एम,डी. आपटे यांनी स्थापन केलेले एक खासगी विद्यापीठ होते. त्यात इंजिनिअरिंगचे प्रात्यक्षिक स्वरूपाचे कार्यानुभवावर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात येई. इ.स. २००१पर्यंत विजय भटकर या विद्यापीठाचे कुलगुरू होते. पुढे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झालेल्या [[स्नेहलता देशमुख]] विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर होत्या.

सुमारे दोन लाख विद्यार्थी विद्यापीठातून शिकून नावारूपास आले. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे या विद्यापीठाचे स्नातक आहेत. हे विद्यापीठ सरकारमान्य नसल्याने कोर्टाच्या नोटिसीमुळे २००६ साली बंद करावे लागले.