Jump to content

ज्ञानपीठ पुरस्कार

पुरस्कारात मिळणारी वाग्देवीची प्रतिमा

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.

सुरुवात

हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी १६ सप्टेंबर, इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल, इ.स. १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. २९ डिसेंबर १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर यांना प्रदान करण्यात आला.

निवडीचे निकष व प्रक्रिया

भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. इ.स. १९६७ मध्ये गुजराती व कानडी, इ.स. १९७३ मध्ये उडिया व कानडी तसेच इ.स. २००६ मध्ये कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते.

भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अ‍ॅडव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.

पुरस्काराचे स्वरूप

ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात आहे.

विजेते

भाषेनुसार पुरस्कार प्राप्तकर्ते
भाषा पुरस्कार प्राप्तकर्ते
आसामी
इंग्रजी
उडिया
उर्दु
कन्नड
काश्मिरी
कोकणी
गुजराती
तमिळ
तेलुगू
पंजाबी
बंगाली
मराठी
मल्याळम
संस्कृत
हिंदी
१०
वर्षनावकृतिभाषा
१९६५जी शंकर कुरुपओटक्कुष़ल (वंशी)
(कविता संग्रह)
मल्याळम
१९६६ताराशंकर बंधोपाध्यायगणदेवता
(कादंबरी)
बंगाली
१९६७के.वी. पुत्तपाश्री रामायण दर्शणम
(कविता)
कन्नड
उमाशंकर जोशीनिशितागुजराती
१९६९फ़िराक गोरखपुरीगुल-ए-नगमा
(कविता संग्रह)
उर्दू
१९७०विश्वनाथ सत्यनारायणरामायण कल्पवरिक्षमुतेलुगू
१९७१विष्णू डेस्मृति शत्तो भविष्यतबंगाली
१९७२रामधारी सिंह दिनकरउर्वशीहिंदी
१९७३दत्तात्रेय रामचंद्र बेन्द्रेनकुतंतिकन्नड
गोपीनाथ मोहांतीमाटीमटालउडिया
१९७४विष्णू सखाराम खांडेकरययाति
(कादंबरी)
मराठी
१९७५पी.वी. अकिलानंदमचित्रपवईतमिळ
१९७६आशापूर्णा देवीप्रथम प्रतिश्रुतिबंगाली
१९७७के. शिवराम कारंतमुक्कजिया कनसुगालुकन्नड
१९७८अज्ञेयकितनी नावों में कितनी बारहिंदी
१९७९बिरेन्द्र कुमार भट्टाचार्यमृत्यंजयआसामी
१९८०एस.के. पोत्ताकटओरु देसात्तिन्ते कथामल्याळम
१९८१अमृता प्रीतमकागज ते कैनवासपंजाबी
१९८२महादेवी वर्मा-हिंदी
१९८३मस्ती वेंकटेश अयंगार-कन्नड
१९८४तकाजी शिवशंकरा पिल्लै-मल्याळम
१९८५पन्नालाल पटेल-गुजराती
१९८६सच्चिदानंद राउतराय-उडिया
१९८७वि.वा. शिरवाडकर-मराठी
१९८८डॉ. सी नारायण रेड्डी-तेलुगु
१९८९कुर्तुलएन हैदर-उर्दू
१९९०वी.के.गोकक-कन्नड
१९९१सुभाष मुखोपाध्याय-बंगाली
१९९२नरेश मेहता-हिंदी
१९९३सीताकांत महापात्र-उडिया
१९९४यू.आर. अनंतमूर्ति-कन्नड
१९९५एम.टी. वासुदेव नायर-मल्याळम
१९९६महाश्वेता देवी-बंगाली
१९९७अली सरदार जाफरी-उर्दू
१९९८गिरीश कर्नाड-कन्नड
१९९९निर्मल वर्मा-हिंदी
गुरदयाल सिंह-पंजाबी
२०००इंदिरा गोस्वामीआसामी
२००१राजेन्द्र केशवलाल शाह-गुजराती
२००२दण्डपाणी जयकान्तन-तमिळ
२००३गोविंद विनायक करंदीकर-मराठी
२००४रहमान राही[]-काश्मिरी
२००५कुॅंवर नारायण-हिंदी
२००६रवींद्र राजाराम केळेकर-कोंकणी
सत्यव्रत शास्त्री-संस्कृत
२००७ओ.एन.वी. कुरुप-मल्याळम
२००८अखलाक मुहम्मद खान शहरयार-उर्दू
२००९अमर कांत-हिंदी
श्रीलाल शुक्ल-हिंदी
२०१०चन्द्रशेखर कम्बार-कन्नड
२०११प्रतिभा राय-उडिया
२०१२रावुरी भारद्वाज-तेलुगू
२०१३केदारनाथ सिंह-हिंदी
२०१४भालचंद्र वनाजी नेमाडे-मराठी
२०१५रघुवीर चौधरी-गुजराती
२०१६शंख घोष-बंगाली
२०१७कृष्णा सोबती-हिंदी
२०१८अमिताव घोष-इंग्रजी
२०१९अक्कितम अच्युतम नंबुद्री-मल्याळम
२०२१नीलमणी फूकन-आसामी
२०२२दामोदर मावजो-कोंकणी
टीप

 •  - १९८२ नंतर, लेखकाच्या कोणत्याही एक विशिष्ट कृतिस पुरस्कार प्रदान न करता त्यांच्या लेखनाच्या संपूर्ण संकलनाचा विचार केला जातो.

पुढील वाचन

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ http://jnanpith.net/images/40thJnanpith_Declared.pdf Archived 2009-04-07 at the Wayback Machine. 40th Jnanpith Award to Eminent Kashmiri Poet Shri Rahman Rahi