Jump to content

जोसेफ कॅमह्युबर

जोसेफ कॅमह्युबर (१९ ऑगस्ट, १८९६:ट्युस्लिंग, बव्हारिया, जर्मनी - २५ जानेवारी, १९८६:म्युन्शेन, जर्मनी) हे लुफ्तवाफे आणि नंतर जर्मन वायुसेनेतील उच्चाधिकारी होते. त्यांनी कॅमह्युबर रेघ नावाने ओळखला जाणारा रात्रीच्या वेळी लढाऊ विमानांचा व्यूह रचला होता. आपल्या सेनापतींशी वाद झाल्यामुळे त्यांची दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४३ साली लुफ्तवाफेमधूल हकालपट्टी झाली. युद्धानंतर ते बुंडेसवेह्रमध्ये दाखल झाले.