Jump to content

जोतं

जोते किंवा जोतं हे पारंपारिक पद्धतीने बांधलेल्या घराचा पाया होय.हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वापरण्यात येणारा शब्द आहे.यास पायवा असेही म्हणतात. जोतं जमिनीपासून साधारणपणे २ फूट उंच असते. पायऱ्या चढून जोत्यावर यावे लागते. जोते जेवढे मजबूत तेवढे घर टिकावू समजले जाते.भिंती, दारे खिडक्या छत आदींचे वजन योग्य रितीने जमिनीत अंतरण (ट्रांसफर) करण्यास जोत्याचा वापर होतो.तसे न झाल्यास बांधकाम कोसळण्याचा संभव असतो. जोत्याचे बांधकाम सहसा दगडी असते. त्यावर भिंती रचल्या जातात. अनेक पारंपारिक घरांची जोती अनेक शतके टिकून आहेत.