जोगोवा सेवा समिती
जोगोवा सेवा समिती ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे.[१] २०१४ साली भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील जोगोवा हा शब्द जोशी, गोंधळी व वासुदेव या तीन जातींच्या आद्यक्षरावरून घेण्यात आला आहे.
नांदेड, ठाणे, औरंगाबाद, वाळुजपंढरपूर, जालना, जाफ्राबाद, खासगाव इ. ठिकाणी या संघटनेच्या शाखा आहेत.[२][३]
इतिहास व उद्देश
७ जून २०१४ रोजी ही संघटना नांदेड येथे स्थापन करण्यात आली. जोगोवा सेवा समितीने जोशी, गोंधळी व वासुदेव हे तिन्ही समाज एक छताखाली आणले. माणिकरावजी रेनकेसाहेब व इतर समाजातील २ जणांनी या एकत्रित होऊन आपल्या भिक्षेकरी समाजासाठी ही समिती स्थापन केली. समाजातील शैक्षणिक व समाजातील समाज बांधवांना एकत्रित राहून काम करण्याची विचारधारा मांडली. महाराष्ट्रात आपल्या समाजाला शासनातील योजनांत व लोककलावंतांना आकाशवाणी केंद्रांवर प्रोत्साहन मिळून मानधन मिळावे. समाजावर होणारे अत्याचार थांबावे म्हणून जोगोवा सेवा समिती महाराष्ट्र राज्यात काम करत आहे.
उद्देश
- समाजातील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मेळावे, परिषद, कार्यशाळा, अधिवेशन इ.आयोजित करणे.
- समाजातील समस्या, दारिद्रय, मागासलेपणा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे.
- समाजातील समाजिक राजकीय आर्थिक व सांस्कृतिक समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देणे.