जोगेश्वरी
जोगेश्वरी
जोगेश्वरी हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. अंधेरीच्या उत्तरेस वसलेले जोगेश्वरी येथील अनेक गुहांसाठी प्रसिद्ध आहे.
वाहतूक
जोगेश्वरी रेल्वे स्थानक हे जोगेश्वरीमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेट व बोरिवलीकडे जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरीच्या पूर्वेकडून धावतो. जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता जोगेश्वरीला विक्रोळीसोबत जोडतो. मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडून पूर्व उपनगरांकडे जाणारी बव्हंशी वाहने ह्या रस्त्याचा वापर करतात.
मतदार संघ
- जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ
- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ