Jump to content

जो.रा. सिटी हायस्कूल (धुळे)

जो.रा.सिटी हायस्कूल तथा जोधराज रामलाल सिटी हायस्कूल ही महाराष्ट्र राज्यातील धुळे शहरात असलेली शाळा आहे. धुळे एज्युकेशन सोसायटी ही शाळा चालवते आहे. शाळेतील गीताजयंती उत्सव आणि शाळेतून घडणारे मल्लखांब खेळाडू शाळेची वेगळी ओळख आहे. धुळे बसस्थानकाला लागूनच जेलरोड परिसरात ही शाळा आहे.