जॉर्डनचा राजा हुसेन
हुसेन | |
जॉर्डनचा राजा | |
कार्यकाळ १७ ऑगस्ट १९५२ – ७ फेब्रुवारी १९९९ | |
मागील | तलाल |
---|---|
पुढील | अब्दुल्ला दुसरा |
जन्म | १४ नोव्हेंबर १९३५ अम्मान |
मृत्यू | ७ फेब्रुवारी, १९९९ (वय ६३) अम्मान |
वडील | तलाल |
धर्म | सुन्नी इस्लाम |
सही |
हुसेन बिन तलाल (अरबी: حسين بن طلال; १४ नोव्हेंबर १९३५ - ७ फेब्रुवारी १९९९) हा मध्य पूर्वेतील जॉर्डन देशाचा राजा होता. राजा तलाल ह्याला केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर १९५२ मध्ये खराब प्रकृतीमुळे पायउतार व्हावे लागले व त्याचा मुलगा हुसेन वयाच्या १६व्या वर्षी जॉर्डनचा राजा बनला. पुढील ४७ वर्षे तो सत्तेवर होता.
हुसेनने मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले व १९९४ साली इस्रायल देशाला मान्यता दिली. ७ फेब्रुवारी १९९९ रोजी कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत