Jump to content

जॉर्डन नदी

जॉर्डन नदी (हिब्रू:נְהַר הַיַּרְדֵּן‎ नहर हा-यार्देन; अरबी: نَهْر الْأُرْدُنّ‎ नहर अल-उर्दुन; प्राचीन ग्रीकः Ιορδάνης, आयोर्डेन्स; ) ही मध्यपूर्व आशियातील छोटी नदी आहे. ही नदी गोलान टेकड्यांमध्ये उगम पावून दक्षिणेस वाहते गॅलिलीच्या समुद्रास मिळाल्यावर ती दुसऱ्या बाजूस बाहेर पडते व तेथून पुढे मृत समुद्रास मिळते.

या नदीच्या किनाऱ्यावर लेबेनॉन, इस्रायेल, जॉर्डन, पॅलेस्टाइन व सिरिया हे देश आहेत.

ख्रिश्चन आणि ज्यू धर्मांमध्ये या नदीला मोठे महत्त्व आहे. जॉन बॅप्टिस्टने येशू ख्रिस्ताला या नदीत बाप्तिस्मा दिला होता तर इस्रायेली लोक प्राचीन काळी ही नदी ओलांडून प्रॉमिस्ड लॅंडमध्ये[मराठी शब्द सुचवा] आले.