जॉर्जिया (अमेरिका)
जॉर्जिया Georgia | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | अटलांटा | ||||||||||
मोठे शहर | अटलांटा | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत २४वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,५३,९०९ किमी² | ||||||||||
- रुंदी | ३७० किमी | ||||||||||
- लांबी | ४८० किमी | ||||||||||
- % पाणी | २.६ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ९वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ९६,८७,६५३ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ५४.६/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | ५०,८६१ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | जानेवारी २, इ.स. १७८८ (४वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | GA | ||||||||||
संकेतस्थळ | www.georgia.gov |
जॉर्जिया (इंग्लिश: Georgia; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले जॉर्जिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने नवव्या क्रमांकाचे राज्य आहे. जॉर्जियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून ईशान्येला साउथ कॅरोलायना, उत्तरेला नॉर्थ कॅरोलायना व टेनेसी, दक्षिणेला फ्लोरिडा तर पश्चिमेला अलाबामा ही राज्ये आहेत. अटलांटा ही जॉर्जियाची राजधानी, सर्वात मोठे शहर व महानगर आहे.
इ.स. १७३२ साली स्थापन झालेली जॉर्जिया ही तेरा मूळ ब्रिटिश वसाहतींपैकी सर्वात शेवटची वसाहत होती. राजा जॉर्ज ह्याचे नाव ह्या वसाहतीला दिले गेले. जानेवारी २, इ.स. १७८८ रोजी अमेरिकन गणराज्यात सामील झालेले जॉर्जिया हे चौथे राज्य होते. जानेवारी २१, इ.स. १८६१ रोजी जॉर्जियाने अमेरिकन संघामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या अमेरिकन यादवी युद्धामध्ये अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखालील उत्तरेकडील संघराज्यांनी दक्षिणी राज्यांना पराभूत केले. जुलै १५, इ.स. १८७० रोजी जॉर्जियाला पुन्हा अमेरिकेत दाखल केले गेले.
मोठी शहरे
खालील पाच जॉर्जियामधील सर्वात मोठी शहरे आहेत.[१]
शहर | लोकसंख्या |
---|---|
अटलांटा | ४,२०,००३ |
ऑगस्टा | १,९५,८४४ |
कोलंबस | १,८९,८८५ |
सव्हाना | १,३६,२८६ |
अथेन्स | १,१५,४५२ |
महानगर क्षेत्र | लोकसंख्या |
---|---|
अटलांटा | ५२,६८,८६० |
ऑगस्टा | ५,५६,८७७ |
सव्हाना | ३,४७,६११ |
कोलंबस | २,९४,८६५ |
मेकन | २,३२,२९३ |
शिक्षण
गा टेक व जॉर्जिया विद्यापीठ ह्या अमेरिकेमधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे जॉर्जियामध्ये स्थित आहेत.
वाहतूक
अटलांटा महानगरात स्थित असलेला हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
गॅलरी
- अटलांटा ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
- गा टेकचा टेक टॉवर.
- जॉर्जियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- जॉर्जिया राज्य विधान भवन.
- जॉर्जियाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
संदर्भ
- ^ "American FactFinder". Factfinder2.census.gov. 2011-08-05 रोजी पाहिले.