Jump to content

जॉन शोअर

जॉन शोअर

जॉन शोअर (५ ऑक्टोबर, इ.स. १७५१ - १४ फेब्रुवारी, इ.स. १८३४) हा ब्रिटिश भारतात बंगालचा पर्यायाने भारताचा गव्हर्नर जनरल होता. इ.स. १७९३ साली लॉर्ड कॉर्नवालिसनंतर बंगालच्या गव्हर्नर जनरलपदाची सूत्रे त्याने हाती घेतली.

कारकीर्द

इ.स. १७६९ साली जॉन शोअर बंगालमध्ये एक लेखन‍िक म्हणून आला होता. त्यानंतर लवकरच तो महसूल खात्यात दाखल झाला. काळाच्या ओघात तो महसूलाच्या कामकाजातील तज्ज्ञ झाला आणि लवकरच गव्हर्नर जनरलच्या एक्झक्यिूटिव्ह कौन्स‍िलचा सदस्य व इ.स. १७८६ साली बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्ष झाला. इ.स. १७९२ मध्ये तो इंग्लंडला रजेवर गेला व तिथे त्याला बॅरोनेट या पदवीने सन्मानित करण्यात आले. पुढच्याच वर्षी त्याने कॉर्नवालिसचा उत्तराधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली.