Jump to content

जॉन कॉम्प्टन

सर जॉन जॉर्ज मेल्व्हिन कॉम्प्टन (इंग्लिश: Sir John George Melvin Compton; २९ एप्रिल १९२५ - ७ सप्टेंबर २००७) हा सेंट लुसिया देशामधील एक राजकारणी व तीन वेळा पंतप्रधान होता. १९६४ ते १९७९ दरम्यान ब्रिटिश अधिपत्याखाली असताना त्याने सेंट लुसियाचे नेतृत्व केले व १९७९ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो देशाचा पहिला पंतप्रधान बनला. त्यानंतर १९८२ ते १९९६ व २००६ ते २००७ दरम्यान तो पुन्हा पंतप्रधानपदावर होता. पदावर असतानाच कॉम्प्टन ७ सप्टेंबर २००७ रोजी आजारपणामुळे मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर स्टीफनसन किंग देशाचा नवा पंतप्रधान बनला.