जॉन ओस्वाल्ड
जॉन ओस्वाल्ड (३० मे, इ.स. १९५३:किचनर, ओन्टॅरियो - ) हा कॅनडातील संगीत रचनाकार, वायुवाद्यवादक, माध्यम कलाकार आणि नर्तक आहे. त्याच्या ध्वनिचौर्य या प्रकल्पामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. (आधीच) अस्तित्वात असलेल्या संगीत रचनांमधून नवे संगीत निर्माण करणे हे ध्वनिचौर्यसमजले जाते. त्याच्या तथाकथित नवनिर्मितीमुळे ओस्वाल्ड युरोपियन-पाश्चात्त्य संगीत विश्वात अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. माईल्स बोवी हा संगीत समीक्षक व लेखक उपहासाने ओस्वाल्डला "संगीतध्वनिचौर्याचा जनक' असे संबोधतो[१]
कॅनडा कौन्सिल फॉर आरट्स या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २००४ सालच्या वार्षिक गव्हर्नर जनरल्स अवॉर्ड् इन व्हिज्युअल अँड मीडिया आर्ट्स या पुरस्कार विजेत्यांच्या सातजणांच्या यादीत ओस्वाल्डचा समावेश होता. त्याला मीडिया आर्टिस्ट हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.[२] लंडन ऑबझर्व्हर ने त्याला पृथ्वीवरचा सर्वात झपाटलेला माणूस म्हणले आहे.[३]
ध्वनिचौर्यविषयक तत्त्वज्ञान
"Plunderphonics" ही संज्ञा ओस्वाल्डने "Plunderphonics, or Audio Piracy as a Compositional Prerogative"[४] या शोध निबंधात उपयोगात आणली. ही संकल्पना त्याची निर्मिती आहे. त्याने हा निबंध टोरोन्टो येथे १९८५ साली भरलेल्या वायर्ड इलेक्ट्रो-अकौस्टीक कॉन्फरंस येथे सादर केला होता.१९६० सालापासून ओस्वाल्डने "संगीतध्वनीचौर्य तंत्र' अमलात आणले. ही प्रेरणा त्याने विलियम्स एस. बरो या अमेरिकन लेखक, उपहास लेखक, चित्रकार आणि वक्ता याच्याकडून घेतली.
चौर्य उक्ती
- "सर्जनशीलता हे शेत आहे असा विचार केला तर, प्रताधिकार (कॉपीराईट) हे कुंपण आहे" या उक्तीचा तो जनक आहे.
हे विधान ओस्वाल्डने १९८८ साली Keyboard Magazineच्या अतिथी संपादकीयात व्यक्त केले आहे.त्याचा वृत्तांत गेरी बेलांजर या विदुषीने दिल्याचे डेव्हिड सन्जेक एका लेखात लिहितो. हा लेख Martha Woodmansee, Peter Jaszi यांनी संपादित केलेल्या The Construction of Authorship: Textual Appropriation in Law and Literature या ग्रंथात प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ १९९४ साली प्रसिद्ध झाला. तो Duke University Press, Durham and London यांनी प्रकाशित केला. त्यातील पान ३५८ वर डेव्हिड सन्जेक हा लेखक गेरी बेलांजरचे अवतरण देतो; त्यात ओस्वाल्डचे वरील विधान येते. त्याचा उल्लेख कटलर हा लेखक त्याच्या लेखात करतो.
हेही पाहा
The Viral Communications Anti-Copyright Policy
Plunderphonics - O'Hell (The Doors)
Mystery Tapes — My Desert Island Vinyl Collection
बाह्य दुवे
- Biography: on the plunderphonics site
- paused on the threshold…
- "Some Assembly Required", 2001 interview with John Oswald
संदर्भ
- ^ 1992: John Oswald – Plexure, by MILES BOWE · June 15, 2012, "John Oswald, father of Plunderphonics" http://www.tinymixtapes.com/delorean/john-oswald-plexure
- ^ http://canadacouncil.ca/council/prizes/major-prizes/governor-generals-awards-in-visual-and-media-arts/list-of-winners Archived 2015-11-16 at the Wayback Machine., २७ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ http://www.plunderphonics.com/xhtml/xoswaldbio.html, २७ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ http://www.plunderphonics.com/xhtml/xplunder.html २७ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.