जॉन अँटोनियो
जॉन जॉर्ज अँटोनियो (१९३० - मे २०१३) हे एक अमेरिकन अॅडव्हर्टाईझिंग एक्झिक्युटिव्ह होते. यांची क्लेमसन युनिव्हर्सिटीमधील टायगर क्लॉ लोगोची रचना फार प्रसिद्ध आहे.[१][२][३] दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले येथे हेंडरसन ॲडव्हर्टायझिंगमध्ये अँटोनियोने विकसित केलेला आयकॉनिक क्लेमसन स्पोर्ट्स लोगोचे २१ जुलै १९७० रोजी अनावरण करण्यात आले.
अँटोनियोने १९६० च्या दशकात शिकागो, इलिनॉयमधील लिओ बर्नेट या अॅड एजन्सीसाठी काम केले.[१] ग्रीनविले न्यूजला दिलेल्या १९७० मधील मुलाखतीनुसार, अँटोनियोने लिओ बर्नेट एजन्सी टीमबरोबर काम करून मोर्टन सॉल्ट गर्ल, पिल्सबरी डफबॉय आणि युनायटेड एरलाइन्ससाठी “फ्लाय फ्रेंडली स्काय ऑफ युनायटेड” जाहिरात मोहीम तयार केली.
बऱ्याच काळापासून असणारे क्लेमसन टायगर्स फुटबॉलचे प्रशिक्षक फ्रँक हॉवर्ड १९६९ मध्ये सेवानिवृत्त झाले..[२] त्यांच्या जागी १९७० मध्ये हूटी इंग्राम यांची निवड फुटबॉलचे प्रशिक्षक पदावर झाली. या हस्तांतरातच क्लेमसन विद्यापीठाचे अध्यक्ष आर सी एडवर्ड्स यांनी ग्रीनविलेयेथील हेंडरसन ॲडव्हर्टायझिंगला विद्यापीठ आणि त्यातील अॅथलेटिक संघांची प्रतिमा उजळवण्याचे काम दिले.
हँडरसन ॲडव्हर्टायझिंगचे असलेले कर्मचारी अँटोनियो यांना नवीन लोगो आणि शुभंकर (मॅसकॉट) तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. अँटोनियो यांनी वाघाच्या पंज्याचा लोगो बनवायचे ठरवले. अँटोनियोंच्या विनंतीवरून शिकागो येथील नैसर्गिक इतिहासातील फील्ड संग्रहालयात असलेल्या खऱ्याखुऱ्या [[बंगाल]]च्या वाघाच्या पंजाच्या प्लास्टर कास्टवर त्यांनी नवीन पंजा लोगो बनविला.[२][४]
अँटोनियोने १९७० मध्ये वाघाच्या पंजाचा लोगो तयार केला.[२] क्लेमसन विद्यापीठाने अँटोनियोच्या निर्मितीचे अनावरण दक्षिण कॅरोलिना, शार्लोट, नॉर्थ कॅरोलिना आणि अटलांटा, जॉर्जिया येथे झालेल्या पत्रकार परिषदांच्या मालिकेत केले.
जॉन अँटोनियो यांचे २३ मे २०१३ रोजी दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले येथे त्यांच्या वयाच्या ८३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.[१][२]
संदर्भ
- ^ a b c Robinson, Mandrallius (2013-05-31). "Antonio, creator of Clemson's paw logo, dies". The Greenville News. 2013-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-29 रोजी पाहिले.
- ^ a b c d e Brenner, Aaron (2013-05-30). "1970 designer of Clemson's Tiger Paw logo, John Antonio, dies of cancer". The Post and Courier. 2014-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-29 रोजी पाहिले.
- ^ "Creator of Clemson's paw logo dies". Gaston Gazette. 2013-06-03. 2013-06-29 रोजी पाहिले.
- ^ "Clemson loses man who made a major mark". The Times and Democrat. 2013-05-31. 2013-06-29 रोजी पाहिले.