Jump to content

जैवविविधित संवर्धन व वनसंगोपण


आपल्या  जमिनीची  दर वर्षी येणारी पिके घेतली कि झाले आपले काम झाले असे मानून आजचा शेतकरी राहिलेल्या वेळेत जोड धंदा करण्याऐवजी सरकारच्या  आशेवर  जगतो. पण शेतीहा धंदा व्यापक व अनेक गोष्टी वर अवलंबून असणारा आहे त्यामुळे आजच्या बदलत्या ऋतूचक्रा  मुळे कोणती गोष्ट कधी दगा देईल हे सांगता येत नाही. शेतीसाठी सुपीक जमीन, हवामान, योग्य बी बियाणे, पाण्याची उपलब्धता, कीड नियंत्रण इत्यादी घटक बरोबरच वन म्हणजे  जंगल हा एक महत्त्वाचा भाग आहे . पण या घटक कडे सर्वाचं दुर्लक्ष्य  आहे. ही एक चिंता जनक बाब आहे. चांगली जंगले असतील तर तेथील पाऊसमान वाढेल असे तंज्ञाच्ये मत आहे. हे समाजाला व शासनाला माहित आहे तरी या गोष्टी कडे दुर्लक्ष्य आहे. जंगलाचा पालापाचोळा वाहून आल्याने जमीन सुपीक होतील त्यांच्यातील शेंद्रियें घटक वाढल्यास उत्पादन वाढेल त्याच बरोबर जंगलामुळे जमिनीत पाणी झिरपणयाच्या प्रमाणात वाढ होईल व भूजल पातळी वाढेल हे नक्कीच, केवळ जमिनीची धूप थांबवणे व पाणी पातळी वाढवणे एवढ्याच गोष्टी लक्ष्यात घेतल्या तरी शेतीसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल.  

शेती हा धंदा देशाला खूप महत्त्वाचा धंदा आहे. स्वत्र्यiनंतर देशात प्रचंड उद्योग धंदे सुरू झiले परुंतु शेती ह्या धंद्याची जागा कोणीच घेऊ शकला नाही व घाऊ शकणारहि नाही हे तितकंच खरे. तरीही शेती ह्या धंद्याकडे सरकारचे पाहिजे तसे लक्ष्य राहिले नाही. जर आज सरकारचे शेती कडे लक्ष्य राहिले असते तर सरकारने वन संगोपन व वन संरक्षण  केले असते. महाराष्ट्रातील जंगले दिवसेन दिवस पोरकी होत चालली आहेत त्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. पूर्वी आदीवासी समाज हा आजच्या शिक्षित समाज पेक्षा किती तरी प्रमाणात चांगले मानावे लागेल, कारण कि आदीवासी समाज जंगलातून मिळणाऱ्या संसाधनाची परतफेड करायचा व वाणांची पूजा करायचा त्यातून वन सनसंरक्षण व वन संवर्धन होत होते. पण आजच्या शिक्षित समाजाला फक्त वृक्ष तोड माहित आहे . त्यामुळे जमिनी सोडाच डोंगर टेकड्या सुद्धा उगड्या बोडक्या झाल्या आहेत. अर्थात त्याचा भीषण परिणाम आपल्याला भोगावं लागत आहेत.

त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले.  जमिनीची सुपीकता नष्ट झाली आहे.  त्याचा परिणाम पाहता उत्पन्न कमी झाले. आज गावच्या गावे अशी आहेत कि ज्या ठिकाणी वर्षभर लोकांना प्यायला पाणी नसते. शेतातल्या विहिरींना पाणी कमी आसते. शेत, टेकड्या, माळ रान उजाड झाल्याने हवा रखरखीत व उष्ण होत आहे, कारण कि माणसाने बेसुमार झाडे तोडल्यामुळे त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळत आहे.

पूर्वी हिमालयच्या डोंगर उत्तरावर  भरपूर झाडे होते तेव्हा नदी, नाले, ओढा व विहारीला भरपूर पाणी होते .  पण कालांतरानी जंगल तोड वाढली व सर्वे झाडे नष्ट झाली त्याचा परिणामामुळे नदी, नाले, विहिरी  ह्या कोरड्या झाल्या आहेत म्हणून उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. तापमानात भरपूर वाढ झाली आहे. हवामानात बदल जाणवू लागला आहे .

डोंगर उजाड झाल्याने जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनी नापीक झाली आहे तेव्हा हिमालयातील लोकांनी एकत्रपणे चिपको आंदोलन सुरू केले म्हणजे कोणी झाड तोडत असेल तर झाडाला मिठी मारत व झाड तोडणीन होऊ देता त्याचे संरक्षण करत असत,  अशा प्रकारे चिपको आंदोलन केल्या मुळे किती तरी झाडे तोडण्या पासून वाचवली त्याचा परिणाम पाहता तेथील जमिनी तील पाण्याची पातळी वाढली .

जंगल / वनातील नव्हे तर शेतातील झाडे ही आपल्या शेतीसाठी कसे फायद्याचे ठरत आहे जसे झाडा पासून सावली मिळते, झाडाच्या  पाना - पाचोळ्या पासून शेंद्रीय खात मिळते, शुद्ध हवा मिळते, तसेच मुळापासून जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण वाढते.

आजचा शेतकरी केरकचरा कुजू नदेता, सडू नदेता त्याला जाळन्याच्या गरबडीत असतो व जाळून कचरा नष्ट करतो. पण याच काचऱ्यातुन खात निर्मितीना करता जाळून मोकळा होतो. झाडेना जळत ती कुजून खत तयार करता येईल व त्या मुळे जमिनीत पाणी पाझरण्याचे  प्रमाण वाढल्या मुळे जमीन सुपीक होते, तसेच पवसाळ्यत पाणी पाझरून जमिनीत जलसाठा वाढेल.  तसेच झाडे, गवत, झुडूप या मुळे मातीची झीजहि होत नाही. पण आपण कचरा जाळला तर जमिनीची धूप होते व पाणी पाझर नहोता वाहून जातो तसेच पाण्या बरोबर  सुपीक माती सुद्धा वाहून जाते व जमिनीची सुपीकता नष्ट होते.

महाराष्ट्रातील विविध विभागातील पाऊसाचे प्रमाण विविध असल्या मुळे सगळी कडे शम प्रमाणात भूजल पाहायला मिळत नाही कुठे कमी पाणी आहे तर कुठे मुसळधार पाऊस पडतो कारण सगळी कडे सम प्रमाणात वनसंपदा नाही तर कुठे जास्त आहे तर कुठे फारच कमी प्रमाणात वन संपदा पाहायला मिळते त्या मुळे भूजल पातळी सुद्धा कमी जास्त प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी जंगल आहे त्या ठिकाणी पाऊस हा समाधान कारक होतो तर ज्या ठिकाणी जंगल कमी आहे त्या ठिकाणी पाऊस फारच कमी पडतो. तसेच पावसाची आनियमितता पाहायला मिळते . त्याचा परिणमा मुळे  शेतकरीचे नियोजन बिघडून जाते.

आपण अभ्यास केला तर असे लक्षात येईल कि जेव्हा अति वृष्टी झाल्यास , कोरडा दुष्काळ झाल्यास, पाऊस कमी पडल्यास, बेमोसमी पाऊस पांड्यलास कोणताच परिणाम हा जंगल संपदेवर होत नाही तर जंगल हे कोणत्याही संकटाला तोंड द्याल तयार राहते. वनसंपदा किती पर्यावरण पूरक आहे किती मानव समाजाला फायद्याची  आहे . त्या मुळे शेती बरोबरच फळझाडांची लागवड करायला पाहिजे जसे चिंच, आंबा, बाभूळ, नीम, सागवान  या पासून आपल्याला फळ बरोबरच निसर्ग संतुलन सुद्धा राहू शकतो.

पारंपरिक शेती बरोबरच वनशेती, फळशेती केल्यास कमी पाण्यात, कमी मेहनतीत काही अधिक उत्पादन होऊ शकते. वन शेतीत साग, बाभूळ, निलगिरी इत्यादी प्रकारच्या शेतीत तुन उत्पादनातून फायदा घेता येते.   तर चिंच, आंबा, नारळ, फणस, चिकू, जांभूळ या झाडची एकदा लागवड केल्यास साठ ते सत्तर वर्ष सतत उत्पादन देतात व त्याचा फायदा सतत होत राहते व शेतीला जोड धंदा निर्माण करू शकतो.

सामाजिक वनीकरणाच्या एक कोटी वृक्ष लागवडच्या गेल्या वर्षीच्या अभिनयनाने बऱ्याच प्रमाणात वृक्ष लागवड झाली व हे कार्य कौतिकास्पद होते पण फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर त्याचे संरक्षण करावे लागणार आहे.

महाराष्ट्रात सध्या ६३ हजार चौरस किलोमीटर जमीन जंगलविकास यौग्य असून त्या पैकी ५५ हजार  चौरस किलोमीटर ही वनखात्याकडे आहे तर ऐकून जमिनीचा तिसरा हिस्सा माझेच ३३ टक्के जंगलीखाली असावा असे शास्त्रज्ञा मानतात तर महाराष्ट्रातील प्रमाण २२.५ टक्केच आहे तेहि जंगलाखालील उजाड जमीन धरून त्यामुळे गरज आहे ती जलसंपदा वाढविण्याची आणि तेही जर आपण जिल्हयाच्या क्षेत्रफळाच्या आधारे केली तर संपूर्णपने संतुलन ठेवण्यास मदत होईल हे नक्कीच.

तसेच त्याचा फायदा शेतकरी, पक्षी, पशु, प्राणी व जैविविधित सौरक्षण करण्याकरीत खूप मदत होईल. त्याच बरोबर पाणी पातळी वाढवण्यात मदत होईल. त्यामुळे गरज आहे ती जिल्हयानुसार वनसंपदा निर्माण करण्याची, जिल्हयानुसार ३३ टक्के वनसंपदा निर्माण केल्यास जंगल संपदा नवचैतन्य मिळेल हे नक्कीच.