जेसिका लँगे
American actress | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Jessica Lange |
---|---|
जन्म तारीख | एप्रिल २०, इ.स. १९४९ Cloquet (मिनेसोटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) Jessica Phyllis Lange |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
Floruit |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
नियोक्ता | |
राजकीय पक्षाचा सभासद | |
पद |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
सहचर |
|
पुरस्कार |
|
जेसिका फिलिस लॅन्गे (जन्म २० एप्रिल १९४९)[१] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळवणाऱ्या काही कलाकारांपैकी ती एक आहे. तिला दोन अकादमी पुरस्कार, तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाला आहे.[२]
लॅन्गेने किंग काँग (१९७६) या रीमेकमधून व्यावसायिक चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी तिला नवीन स्टार ऑफ द इयरचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.[३] लॅन्गेला दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार मिळाले. कॉमेडी टुटसी (१९८२) मधील सोप ऑपेरा स्टार म्हणून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी तिचा पहिला अकादमी पुरस्कार होता. ब्लू स्काय (१९९४) मध्ये द्विध्रुवीय गृहिणीच्या भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तिचा दुसरा ऑस्कर पुरस्कार होता.[४] तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका फ्रान्सिस (१९८२), कंट्री (१९८४), स्वीट ड्रीम्स (१९८५) आणि म्युझिक बॉक्स (१९८९) साठी होत्या. ऑल दॅट जॅझ (१९७९), द पोस्टमन ऑलवेज रिंग्ज ट्वाइस (१९८१), क्राईम्स ऑफ द हार्ट (१९८६), केप फिअर (१९९१), रॉब रॉय (१९९५), आणि बिग फिश (२००३) या तिच्या इतर प्रमुख चित्रपटातील भूमिकांचा समावेश आहे.
तिची चित्रपटातील कारकीर्द घसरायला लागल्यावर, ओ पायोनियर्स (१९९२) मध्ये काम करत लॅन्गेने दूरचित्रवाणीमध्ये कामास सुरुवात केली. त्यानंतर तिने अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९९५) आणि नॉर्मल (२००३) मध्ये काम केले होते.[५] २०१० मध्ये, एचबीओच्या ग्रे गार्डन्स मध्ये बिग एडीच्या भूमिकेसाठी लॅन्गने तिचा पहिला प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. त्यानंतर लँगने एफएक्सच्या हॉरर अँथॉलॉजी, अमेरिकन हॉरर स्टोरी (२०११–२०१५, २०१८) मध्ये अभिनय करून नवीन ओळख मिळवली, ज्याने तिच्या पहिल्या आणि तिसऱ्या सीझनसाठी दोन अतिरिक्त प्राइमटाइम एमी मिळवले. मिनिसिरीज फ्यूड (२०१७) मधील जोन क्रॉफर्डच्या भूमिकेसाठी तिला तिचे नववे एमी पुरस्कार नामांकन मिळाले.
२०१६ मध्ये, लॅन्गेने लाँग डेज जर्नी टू नाईटच्या ब्रॉडवे पुनरुज्जीवनाच्या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळवला होता.[६]
लॅन्गे ही छायाचित्रकार देखील आहे आणि तिने छायाचित्रांची पाच पुस्तके प्रकाशित केली आहे.[७][८][९] ती एक युनिसेफसाठी सदिच्छा दूत पदावर आहे आणि काँगो आणि रशियात एचआयव्ही/एड्समध्ये सामाजिक सेवेत कार्यरत आहे.[१०][११]
वैयक्तिक जीवन
१९७० ते १९८२ या काळात छायाचित्रकार फ्रान्सिस्को "पॅको" ग्रांडे यांच्याशी लॅन्गेचे लग्न झाले होते.[१२][१३] जरी ते १९७० च्या दशकाच्या मध्यात युरोपला गेल्यानंतर वेगळे झाले असले तरी, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांनी घटस्फोट घेतला नाही. त्यानंतर लँगने त्यांना पोटगी म्हणून एक अघोषित रक्कम दिली.[१४][१५] चरित्रकार अँथनी उझारोव्स्की यांच्या मते, हे जोडपे “जवळचे मित्र राहिले.”[१६]
१९७६ ते १९८२ पर्यंत, तिने प्रसिद्ध लॅटव्हियन बॅले नृत्यकार मिखाईल बॅरिश्निकोव्ह यांच्याशी जोडी बनवली, ज्यांच्याबरोबर तिला तिचे पहिले मूल, अलेक्झांड्रा लँगे "शुरा" बॅरिश्निकोव्ह (जन्म १९८१) झाले.[१७][१५]
१९८२ मध्ये, ती नाटककार सॅम शेपर्डला भेटली आणि त्यांचे नातेसंबंध सुरू झाले. त्यांना दोन मुले होती: मुलगी हन्ना जेन शेपर्ड (जन्म १९८६) आणि मुलगा सॅम्युअल वॉकर शेपर्ड (जन्म १९८७). २००९ मध्ये वेगळे होण्यापूर्वी ते व्हर्जिनिया, न्यू मेक्सिको, मिनेसोटा आणि अखेरीस न्यू यॉर्क शहरात एकत्र राहत होते.[१८]
ती कोणत्याही निश्चित धर्माचे पालन करत नसली तरी ती वेळोवेळी बौद्ध धर्माचे पालन करत असे.[१९] ती शाकाहारी देखील आहे.[२०]
पुरस्कार
तिने दोन अकादमी पुरस्कार, तीन एमी पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कार मिळवला आहे.[२१] तिने सोळा नामांकनांमध्ये पाच गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळवले आहेत. हेलन मिरेन सोबत, लँगच्या नावावर मिनीसिरीज किंवा दूरचित्रवाणी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी सर्वाधिक नामांकनांचा विक्रम आहे.
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने खालील चित्रपटांसाठी लँगेला मान्यता दिली आहे:
- ५५ वा अकादमी पुरस्कार, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नामांकन, फ्रान्सिस (१९८२)
- ५५ वा अकादमी पुरस्कार, सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, टूट्सी (१९८२) - जिंकला
- ५७ वा अकादमी पुरस्कार, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नामांकन, कंट्री (१९८४)
- ५८ वा अकादमी पुरस्कार, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नामांकन, स्वीट ड्रीम्स (१९८५)
- ६२ वा अकादमी पुरस्कार, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नामांकन, म्युजीक बॉक्स (१९८९)
- ६७ वा अकादमी पुरस्कार, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ब्लू स्काय (१९९४ - जिंकला
संदर्भ
- ^ "Today's famous birthdays list for April 20, 2021 includes celebrities George Takei, Andy Serkis". Cleveland.com. April 20, 2021. February 4, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 3, 2022 रोजी पाहिले.
- ^ Multiple sources:
- ^ "King Kong (1976)". Rotten Tomatoes. Fandango. December 17, 1976. April 9, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 29, 2023 रोजी पाहिले.
- ^ Aquilina, Tyler (January 23, 2020). "Scarlett Johansson joins an exclusive club with these Oscar-nominated actors and actresses". Entertainment Weekly. April 29, 2023 रोजी पाहिले.
- ^ Shaw, Gabbi (March 11, 2023). "Then and Now: 25 best actress Oscar winners". Insider. August 1, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 29, 2023 रोजी पाहिले.
- ^ Gerard, Jeremy (May 26, 2015). "Jessica Lange, Gabriel Byrne Will Take Long Day's Journey To Broadway". Deadline Hollywood. September 30, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 29, 2023 रोजी पाहिले.
- ^ Loos, Ted (September 26, 2019). "Highway 61 Revisited, With Jessica Lange". The New York Times. nytimes.com. November 16, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 7, 2020 रोजी पाहिले.
- ^ Multiple sources
- ^ Lange, Jessica (November 8, 2022). Dérive: Photographs by Jessica Lange. powerHouse Books. powerHouse Books. www.simonandschuster.com. ISBN 9781648230226. September 13, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 13, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Jessica Lange". UNICEF. November 16, 2008. unicef.org. March 10, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 11, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Jessica Lange Visits Russia". UNICEF. November 16, 2008. unicef.org. September 11, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 11, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Romance go round". Chicago Tribune. August 1, 1982. June 6, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 6, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Jessica Lange". People. December 27, 1982. March 8, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 23, 2021 रोजी पाहिले.
- ^ "In Step With ... Jessica Lange". Parade. May 25, 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 12, 2011 रोजी पाहिले.
- ^ a b "Family & Companions". Turner Classic Movies. April 21, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 7, 2022 रोजी पाहिले.
- ^ Uzarowski, 2023 p. 46
- ^ Harmetz, Aljean (December 20, 1982). "Jessica Lange, film star whose future is here". The New York Times. February 6, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 29, 2016 रोजी पाहिले.
- ^ Multiple sources:
- ^ Chrissy Iley (January 29, 2007). "Interview: Chrissy Iley meets Jessica Lange". The Guardian. London. September 29, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 7, 2013 रोजी पाहिले.
- ^ Archived at Ghostarchive and the Wayback Machine: Jessica Lange Is Feuding With Kellyanne Conway (In Her Head)
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ "Only 22 people had ever accomplished this feat". The Washington Post. March 1, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 11, 2023 रोजी पाहिले.