Jump to content

जेरेमी रेनर

जेरेमी रेनर
जन्म ७ जानेवारी, १९७१ (1971-01-07) (वय: ५३)
मॉडेस्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९९५ - चालू

जेरेमी ली रेनर (४ नोव्हेंबर, इ.स. १९७१:मॉडेस्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. १९९५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या रेनरने २००० च्या दशकात प्रामुख्याने अनेक लहान बॅनरच्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २००८ सालच्या द हर्ट लॉकर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम अभिनेत्यासाठीच्या ऑस्कर पुरस्काराचे तर २०१० सालच्या द टाउन ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले.

२००११ सालचा मिशन: इम्पॉसिबल - घोस्ट प्रोटोकॉल, २०१२ सालचा द ॲव्हेंजर्स, २०१३ सालचा अमेरिकन हसल इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका करून रेनर हॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जेरेमी रेनर चे पान (इंग्लिश मजकूर)