Jump to content

जेम्स वूड्स

जेम्स हॉवर्ड वूड्स (१८ एप्रिल, १९४७ - ) हा अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. याने चित्रपट, दूरचित्रवाणी तसेच रंगभूमीवर काम केलेले आहे. याने द अनियन फील्ड, वन्स अपॉन अ टाइम इन अमेरिका, अगेन्स्ट ऑल ऑड्स, द हार्ड वे, स्ट्रेट टॉक, द जनरल्स डॉटर, आणि टू बिग टू फेल यांसह अनेक चित्रपटांत अभिनय केला. वूड्सला तीन एम्मी आणि एक गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

वूड्स पोकर खेळाडू असून अमेरिकेतील अनेक स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद मिळवले आहे.