Jump to content

जेम्स मॅडिसन

जेम्स मॅडिसन

कार्यकाळ
४ मार्च १८०९ – ४ मार्च १८१७
मागील थॉमस जेफरसन
पुढील जेम्स मनरो

जन्म १६ मार्च १७५१ (1751-03-16)
व्हर्जिनिया
मृत्यू २८ जून, १८३६ (वय ८५)
व्हर्जिनिया
सही जेम्स मॅडिसनयांची सही

जेम्स मॅडिसन (इंग्लिश: James Madison ;) (१६ मार्च, इ.स. १७५१ - २८ जून, इ.स. १८३६) हा अमेरिकन राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ व अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष होता. अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक मानला जाणाऱ्या मॅडिसनाने ४ मार्च, इ.स. १८०९ ते ४ मार्च, इ.स. १८१७ या काळात अध्यक्षपद सांभाळले.

तो अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रमुख लेखक होता. फेडरॅलिस्ट या इ.स. १७८८ साली प्रकाशित झालेल्या अमेरिकी राज्यघटनेवरील टिप्पणी-स्वरूपातल्या निबंधसंग्रहातील एक-तृतीयांश लेख त्याने लिहिले होते.


बाह्य दुवे


Be−x-old:Джэймз Мэдысан