Jump to content

जेम्स बाँड

जेम्स बॉंड (इंग्लिश: James Bond) हे ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग ह्यांनी इ.स. १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बॉंड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. इयान फ्लेमिंगने बॉंडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इ.स. १९६४ मधील फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर इतर ६ लेखकांनी बॉंडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या.

जेम्स बॉंड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर बॉंडपट म्हणून ओळखले जातात. ह्यांमधील सर्वप्रथम चित्रपट इ.स. १९६२ सालचा डॉ. नो तर सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बॉंडच्या पात्राची स्टाईल, रुबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये जेम्स बॉंडची व्यक्तिरेखा साकारली आहे.

बॉंड चित्रपट यादी

आजवर जेम्स बॉंड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत.

चित्रपट वर्ष अभिनेता
डॉ. नो१९६२ शॉन कॉनरी
फ्रॉम रशिया विथ लव्ह१९६३
गोल्डफिंगर१९६४
थंडरबॉल१९६५
यू ऑन्ली लिव्ह ट्वाईस१९६७
ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस१९६९ जॉर्ज लाझेन्बी
डायमंड्स आर फॉरएव्हर१९७१ शॉन कॉनरी
लिव्ह अँड लेट डाय १९७३ रॉजर मूर
द मॅन विथ द गोल्डन गन१९७४
द स्पाय हू लव्हड् मी१९७७
मूनरेकर१९७९
फॉर यूवर आईज ऑन्ली१९८१
ऑक्टोपसी१९८३
अ व्ह्यू टू अ किल१९८५
द लिव्हिंग डेलाईट्स१९८७ टिमोथी डाल्टन
लायसन्स टू किल१९८९
गोल्डनआय१९९५ पीयर्स ब्रॉस्नन
टुमॉरो नेव्हर डाईज१९९७
द वर्ल्ड इज नॉट इनफ१९९९
डाय अनादर डे२००२
कॅसिनो रोयाल२००६ डॅनियेल क्रेग
क्वांटम ऑफ सोलेस२००८
स्कायफॉल२०१२
स्पेक्टर२०१५
नो टाइम टू डाय२०२०

ह्यांव्यतिरिक्त इतर तीन चित्रपटांमध्ये जेम्स बॉंड हे पात्र नायकाच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु हे चित्रपट इऑन प्रॉडक्शन्सने बनवलेले नसल्यामुळे ते अधिकृत बॉंडपट मानले जात नाहीत.

  • कॅसिनो रोयाल (१९५४)
  • कॅसिनो रोयाल (१९६७)
  • नेव्हर से नेव्हर अगेन (१९८३)

जेम्सचे सर्व चित्रपट हे खूप चागले आहेत

बॉन्ड भूमिका सादरकर्ते

बॉंड अभिनेते
क्रम.नावपहिला चित्रपटअखेरचा चित्रपटसंख्या
नावप्रदर्शन तारीखनावप्रदर्शन तारीख
१.शॉन कॉनरीडॉ. नो५ ऑक्टोबर १९६२डायमंड्स आर फॉरएव्हर१४ डिसेंबर १९७१
२.जॉर्ज लाझेन्बीऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस१२ डिसेंबर १९६९ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस१२ डिसेंबर १९६९
३.रॉजर मूरलिव्ह अँड लेट डाय२७ जून १९७३अ व्ह्यू टू अ किल२२ मे १९८५
४.टिमोथी डाल्टनद लिव्हिंग डेलाईट्स३० जून १९८७लायसन्स टू किल१४ जुलै १९८९
५.पीयर्स ब्रॉस्ननगोल्डनआय१७ नोव्हेंबर १९९५डाय अनादर डे२० नोव्हेंबर २००२
६.डॅनियेल क्रेगकॅसिनो रोयाल१७ नोव्हेंबर २००६स्पेक्टर२६ ऑक्टोबर २०१५

बाह्य दुवे