Jump to content

जेफ्री ॲम्हर्स्ट, पहिला बॅरन ॲम्हर्स्ट

जेफ्री ॲम्हर्स्ट, पहिला बॅरन ॲम्हर्स्ट (जन्म : केन्ट-इंग्लंड, २९ जानेवारी १७१७; - केन्ट-इंग्लंड, ३ ऑगस्ट १७९७) हा अठराव्या शतकात ब्रिटिश सैन्याचा सरसेनापती होता. त्याने सात वर्षांच्या युद्धात सध्याच्या कॅनडामधील लुईबोर्ग(?), क्यूबेक सिटी आणि माँन्ट्रिऑलसह अनेक शहरे, किल्ले व प्रदेश जिंकले व या प्रदेशावर ग्रेट ब्रिटनचे आधिपत्य आणले. हा क्वेबेक प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. या आधी तो व्हर्जिनियाचा क्राऊन गव्हर्नर होता.