जुन्नर तालुका
जुन्नर तालुका जुन्नर | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील जुन्नर तालुका दर्शविणारे स्थान | |
१९.२ उ.अ. ७३.८८ पु.रे. | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | खेड |
मुख्यालय | जुन्नर |
प्रमुख शहरे/खेडी | , ओतूर, नारायणगाव, बेल्हे, जुन्नर, आळेफाटा |
तहसीलदार | हनुमंत कोळकर |
लोकसभा मतदारसंघ | शिरूर |
विधानसभा मतदारसंघ | जुन्नर[१] |
आमदार | अतुल वल्लभ बेनके |
जुन्नर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. जुन्नर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून हा तालुका प्रसिद्ध आहे.
तालुक्यातील गावे
- आगर
- अहिनावेवाडी
- अंजनवळे
- आळमे
- अलदरे
- आळे
- आळेफाटा
- आळु
- आंबे (जुन्नर)
- आंबेगव्हाण
- आंबोळी (जुन्नर)
- अमरापूर (जुन्नर)
- आनंदवाडी (जुन्नर)
- अणे (जुन्नर)
- आपटळे
- आर्वी (जुन्नर)
- औरंगपूर (जुन्नर)
बादशहातलाव बागडवाडी (जुन्नर)बागलोहारेबल्लाळवाडीबांगरवाडी (जुन्नर)बारवबस्ती (जुन्नर)बेल्हेबेळसरभटकळवाडीभिवडेबुद्रुकभिवडेखुर्दभोईरवाडी (जुन्नर)भोरवाडी (जुन्नर)बोरी बुद्रुक (जुन्नर)बोरीखुर्द (जुन्नर)बोतारडेबुचकेवाडीचालकवाडीचावंड (जुन्नर)चिल्हेवाडीचिंचोळी (जुन्नर)दातखिळवाडीदेवळे (जुन्नर)ढालेवाडी तर्फे हवेलीढालेवाडी तर्फे मिन्हेरधामणखेळधनगरवाडी (जुन्नर)ढोलवडडिंगोरेडुंबारवाडीगायमुखवाडी (जुन्नर)घंघाळदरेघाटघरगोदरेगोळेगाव (जुन्नर)गुळुंचवाडीगुंजाळवाडीहडसर (जुन्नर)हापूसबागहातबाणहातविजहिरडी (जुन्नर)हिवरे बुद्रुकहिवरे खुर्दहिवरे तर्फे मिन्हेरहिवरे तर्फे नारायणगावइंगलूणजाधववाडी (जुन्नर)जाळवंदीजांभुळपाडजांभुळशीकाळेकालवडीकांदळी (जुन्नर)करंजाळेकातेडेकेळी (जुन्नर)केवडीखडकुंबेखैरे (जुन्नर)खामगाव (जुन्नर)खामुंडीखानापूर (जुन्नर)खाटकळेखिलारवाडी (जुन्नर)खिरेश्वरखोदाड (जुन्नर)खुबी (जुन्नर)कोल्हेवाडी (जुन्नर)कोळवाडीकोंबडवाडी (जुन्नर)कोपरेकुमशेत (जुन्नर)कुरण (जुन्नर)कुसुर (जुन्नर)मढ (जुन्नर)माळवडी (जुन्नर)मांदर्णेमांडवेमंगरूळ (जुन्नर)माणिकडोह (जुन्नर)मांजरवाडी (जुन्नर)माणकेश्वर (जुन्नर)मुथाळणेनागडवाडीनाळवणेनारायणगाव (जुन्नर)नवलेवाडी (जुन्नर) नेतवाड निमदरीनिमगावसावानिमगाव तर्फे महाळुंगेनिमगिरीनिरगुडे (जुन्नर) ओतुर ओझर (जुन्नर)पाचघरवाडीपडाळी (जुन्नर)पादिरवाडीपांगारी तर्फे मढपांगारी तर्फे ओतुरपारगाव तर्फे आळेपारगाव तर्फे मढपारूंदेपेमदराफागुलगव्हाणपिंपळगावजोगापिंपळगावसिद्धनाथपिंपळगाव तर्फे नारायणगावपिंपळवंडी (जुन्नर)पिंपरवाडी (जुन्नर)पिंपरीकावळापिंपरीपेंढारपुर (जुन्नर)राजुर (जुन्नर)राजुरी (जुन्नर)राळेगणरानमळावाडीरोहकडीसाकोरी तर्फे बेल्हेसंगनोरेसंतवाडीसावरगाव (जुन्नर)शिंदे (जुन्नर)शिंदेवाडी (जुन्नर)शिरोळी बुद्रुकशिरोळी खुर्दशिरोळी तर्फे आळेशिरोळी तर्फे कुकडनेहरशिवळीसीतेवाडीसोमटवाडीसोनावळे (जुन्नर)सुकळवेढेसुलतानपूर (जुन्नर)सुराळेतळेरानतांबे (जुन्नर)तांबेवाडी (जुन्नर)तेजेवाडीतेजुरटिकेकरवाडीउच्छीळउदापूर (जुन्नर)उंब्रज (जुन्नर)उंचखडकवाडीउंडेखडकउसरणवडजवडगाव कांदळीवडगाव साहणीवैशाखखेडेविघ्नहतवडगाव आनंदवाणेवाडी (जुन्नर)वारूळवाडीवाटखळेयादववाडीयेडगाव (जुन्नर)येणेरेझाप (जुन्नर)
इतिहास
दंडकारण्य असलेला भूभाग जेव्हा नागरी वस्तीखाली येऊ लागला, तेव्हा महाराष्ट्र नावाचा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या अस्तित्वात आला.
सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे. साधारण इसवी सनापूर्वी ५०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. प्रतिष्ठान [आताचे पैठण] ही सातवाहन राजांची राजधानी आणि जीर्णनगर [आताचे जुन्नर] ही उपराजधानी होती.
त्या काळी जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. मग नाणे घाट मार्गे ते घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत करत जात असत. तेव्हाचे कर आकारणीचे दगडी रांजण आजही नाणे घाटात आहेत. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती..
हा व्यापार उदीम वाढत जावा, आपल्या प्रदेशाची अशीच भरभराट होत राहावी आणि नाणे घाट मार्गे जुन्नरच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारीमार्गाचे संरक्षण व्हावे आणि लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून त्या त्या वेळच्या राजवटींमध्ये भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, शिंदोला, रांजण गड, कोंबडकिल्ला यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली.
टिकाऊ खडकाचा प्रदेश म्हणून भारतातील सर्वात जास्त गिरिदुर्ग जुन्नरमध्ये निर्माण झाले. देशविदेशातून येणारे व्यापारी त्यांची संस्कृती पण सोबत घेऊन यायचे. जुन्नरमध्ये डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी उत्खनन करत असताना त्यांना ग्रीक लोकांची देवता "युरोस"ची मूर्ती सापडली. चिनी भांडी, जुनी नाणी, सोन्याच्या मोहरा, शिलालेख असे खूप काही या भागात सापडते. येणारे व्यापारी मुक्त हस्ताने दान करत असत.त्यामुळे जुन्नर परिसरात प्रत्येक धर्माची, धर्मपीठाची भरभराट झाली.
भौगोलिक अनुकूलतेबरोबर राजाश्रय व लोकाश्रयही जुन्नर परिसराला मिळत गेला. आणि म्हणूनच लेण्याद्रीला बौद्ध लेणीसमूह निर्माण झाला, मानमोडी डोंगरात जैन देवी देवता अंबा अंबिकांच्या गुहा कोरल्या गेल्या. जुन्नर शहरात प्राचीन जैन मंदिर उभारले गेले.
मध्ययुगीन काळात लेण्याद्रीच्या बौद्ध लेण्यांमध्ये गिरिजात्मक गणपतीची स्थापना झाली, पेशवे काळात जुन्नरजवळच्या ओझरच्या विघ्नहराचा जीर्णोद्धार झाला. जवळच्याच ओतूर येथे गुरू चैतन्य महाराजांनी वैष्णव पंथाचा ’रामकृष्ण हर” हा मंत्र संत तुकारामांना दिला. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रेड्याला जुन्नर तालुक्यातल्या आळे गावी समाधी दिली, पिंपळगाव धरणाजवळ खुबी गावात खिरेश्वर या पांडव कालीन मंदिराची निर्मिती झाली, खिरेश्वराच्या उत्तरेला हरिश्चंद्रगडाची अभेद्य वास्तू उभी राहिली.
फेब्रुवारी १६३०मध्ये जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा जन्म झाला.
पेशवे कालीन महालक्ष्मी मंदिर उंब्रज येथे आहे.कोल्हापूर महालक्ष्मीचे ते उपपीठ मानले जाते
जुन्नरचा भूगोल व आधुनिक इतिहास
जुन्नरला आधी जीर्णनगर मग जुन्नेर आणि नंतर जुन्नर असे नाव बदलत गेले. जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश हा पश्चिमेकडून डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भूभाग आहे. त्यामुळे येथील डोंगर कड्यात माळशेज घाट, नाणे घाट व दाऱ्या घाट आहेत.
अणे घाटातील नैसर्गिक पूल, बोरी गावात कुकडी नदीच्या पात्रात आढळणारी १४ लाख वर्ष जुनी गुंफा ही सारे जुन्नरचे भौगोलिक महत्त्वाची ठिकाणे.आहेत.
जुन्नरमध्ये माणिक डोह धरणाच्या पायथ्याला बिबट निवारा केंद्र उभारण्यात आले असून आजमितीला जवळपास ३० बिबटे वाघ त्या ठिकाणी उपचार घेत आहेत.
समुद्र सपाटीपासून २२६० फूट उंचीवर असणाऱ्या या जुन्नरच्या पठाराला वनरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी भारताचे आरोग्य केंद्र म्हणले आहे. येथील स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वसनाचे आजार बरे होतात हे त्यांचे निरीक्षण होते. म्हणूनच ब्रिटिश काळात ते ब्रिटिशांना जुन्नरला जाऊन आराम करायचा सल्ला देत असत. त्यांनी जुन्नरमध्ये हिवरे बुद्रुक या ठिकणी १८३९ साली वनस्पती उद्यान उभारले होते.
१९९५साली जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण जुन्नर तालुक्यात खोडद या गावी उभारण्यात आली. जवळच आर्वीचे उपग्रह भूकेंद्रही आहे.
जुन्नर तालुक्यातील शेती
आंबा, केळी या फळांचे मूळ ठिकाण परदेशात इंडो-बर्मा भागात आहे, त्याचे मूळ बीज तिथे सापडते. अगदी तेच मूळ बीज माळशेज घाटातसुद्धा सापडते
भाजीपाला, फळफळावळ, दुध दुभते, तांदूळ, ज्वारी, द्राक्षे, डाळिंबे, ऊस आणि निमदरी गावातील फुले अशी विविध प्र कारची शेती जुन्नरमध्ये केली जाते. मांडवी,पुष्पावती,काळू, कुकडी,आणि मिना या नद्यांचा याच तालुक्यात उगम होतो. जुन्नर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे असलेला तालुका आहे. पिंपळगाव जोगा, माणिक डोह, येडगाव, चिल्हेवाडी-पाचघर, आणिडज ही ५ धरणे जुन्नरमध्ये आहेत, संततधार पडणाऱ्या पावसापासून ते अवर्षणग्रस्त भागापर्यतचे भूभाग जुन्नर तालुक्यामध्ये आजआहेत. जुन्नरमध्ये असणारी खोडदची दुर्बीण, बिबट्या चे क्षेत्र व डोंगराळ भाग यामुळे जुन्नरला आरक्षित हरीत पट्टा म्हणून घोषित केले आहे. याचा फायदा असा झाला की जुन्नर मधली मोकळी हवा अशीच शुद्ध राहिली आहे. आणि राहण्यासाठी, फिरण्यासाठी, आरामासाठी आणि पर्यटनसाठी जुन्नर हे अतिशय उपयुक्त ठिकाण बनले आहे. तसेच जुन्नरमध्ये मिळणारी मटण भाकरी आणि मसाला वडी [मासवडी] प्रसिद्ध आहेत.
महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या “शेतकऱ्याचा आसूडमध्ये जुन्नर कोर्टाच्या निकालाचा उल्लेख आहे.
जुन्नर तालुक्याला चित्र शिल्प कलाकार यांची परंपरा आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील शंतनु माळी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचनेदरलँड निवासी, े भास्कर एकनाथ हांडे, चित्रकार पितापुत्र श्री दत्तात्रेय पाडेकर व देवदत्त पाडेकर.
चित्रकार सुभाष अवचटइत्यादी. , मुक्तांगण, कवी, लेखक, विचारवंत, अनिल अवचट, मराठी बाणा’वाले अशोक हांडे, नाटक-सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे, तमाशाची लोककला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणा्ऱ्या विठाबाई नारायणगावकर ही मंडळी मूळ जुन्नरचीच होत. लोकशाहीर मोमीन कवठेकर[२] यांची गीते सादर करणारे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, “टिंग्या” चित्रपटातून कीर्ती मिळवणारे मंगेश हाडवळे, मराठी मालिका क्षेत्रात स्वतचे स्थान निर्माण करणारी नम्रता आवटे ही जुन्नरची आणखी प्रसिद्ध माणसे. शेखर शेटे यांचाही जन्म याच जुन्नरला झाला.
वर्तमानपत्राचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे , पुण्यनगरी, मुंबई चौफेर, यशोभूमी, आपला वार्ताहर वर्तमानपत्र सह बहुभाषिक वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक स्व. मुरलीधर बाबा शिंगोटे यांचा जन्म उंब्रज गावी जुन्नर तालुक्यात झाला होता. मार्मिक मासिकाचे व सामना दैनिकाचे वितरक श्री सावळाराम दांगट हे उंब्रज गावाचे नागरिक मुंबईत फोर्ट विभागात मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक निवडून आले होते.
पर्यटन
क] निसर्गाने नटलेले आठ किल्ले :
- किल्ले चावंड (चावंड गाव)
- किल्ले जीवधन (घाटघर)
- किल्ले नारायणगड (नारायणगाव, खोडद)
- किल्ले निमगिरीव हनुमंतगड (निमगिरी गाव)
- किल्ले शिवनेरी (जुन्नर)
- किल्ले सिंदोळा (मढ, पारगाव)
- किल्ले हडसर (हडसर गाव)
- किल्ले ढाकोबा (आंबोली/ ढाकोबा)
- किल्ले हरिचंद्रगड (खिरेश्वर)
- दारयाघाट जुन्नर
- नाणेघाट जुन्नर
- माळशेज घाट जुन्नर
ख] लेणी समूह :
भारतात जुन्नर तालुका हा भारतातील एकमेव असा तालुका आहे की जेथे सर्वाधिक ३६० लेणी आहेत. त्यांमधे बौद्ध लेण्यांचा समावेश आहे. लेण्यांची यादी :
- मानमुकड बुद्ध लेणी समुह (खोरे वस्ती-जुन्नर)
- खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर)
- चावंड लेणी (चावंड गाव)
- जीवधन लेणी समूह (घाटघर)
- तुळजा भवानी लेणी (पाडळी)
- नाणेघाट लेणी (घाटघर)
- निमगिरी लेणी (निमगिरी गाव)
- भूत (बुद्ध) लेणी (जुन्नर)
- कपिचित बुद्ध लेणी (लेण्याद्री)
- शिवाई लेणी (शिवनेरी किल्ला-जुन्नर)
- सुलेमान लेणी (लेण्याद्री)
- हडसर लेणी (हडसर गाव)
ग] प्रसिद्ध मंदिरे :
- गिरिजात्मक (लेण्याद्री)
- विघ्नेश्वर (ओझर)
ग़-२ ] हेमाडपंथी बांधणीतील प्राचीन मंदिरे :
- कुकडेश्वर मंदिर (कुकडेश्वर)
- नागेश्वर मंदिर (खिरेश्वर)
- अर्धपीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर(पारुंडे)
- हरिश्चंद्रेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड)
ग-३] अन्य प्राचीन मंदिरे :
- उत्तरेश्वर मंदिर (जुन्नर)
- कपर्दिकेश्वर मंदिर (ओतूर)
- खंडोबा मंदिर (धामनखेल)
- खंडोबा मंदिर (नळावणे)
- खंडोबा मंदिर (वडज)
- गुप्त विठोबा-प्रतिपंढरपूर मंदिर (बांगरवाडी)
- जगदंबा माता मंदिर (खोडद)
- दुर्गादेवी मंदिर (दुर्गावाडी)
- पंचलिंगेश्वर मंदिर(जुन्नर)
- पातालेश्वर मंदिर (जुन्नर)
- महालक्ष्मी मंदिर (उंब्रज)
- रेणुका माता मंदिर (निमदरी)
- वरसूबाई माता मंदिर (सुकाळवेढे)
- शनी मंदिर-प्रतिशिंगणापूर (हिवरे-बुद्रुक)
- हाटकेश्वर मंदिर (हाटकेश्वर डोंगर)
- खंडोबा मंदिर (निमगाव सावा)
- यादवकालीन शिवमंदिर (निमगाव सावा)
ग-४] संत समाधिमंदिरे :
- संत जगदगुरू तुकाराम महाराजांचे गुरू - केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी (ओतूर)
- संत मनाजीबाबा पवार संजीवन समाधी(निमगावसावा)
- संत रंगदासस्वामी समाधी (अणे)
- संत ज्ञानेश्वर वेद प्रणीत रेड्याची समाधी (आळे)
घ] निसर्गरम्य घाट :
- अणे घाट
- इंगळून घाट
- कोपरे-मांडवे घाट
- दार्या घाट
- नाणेघाट-पुरातन व्यापारी मार्ग
- माळशेज घाट
- म्हसवंडी घाट
- लागाचा घाट
- हिवरे-मिन्हेरे घाट
च] प्रसिद्घ धबधबे :
1)आंबोली
2)नाणेघाट
3)माळशेज घाट
4)इंगळूज
5)हातवीत
6)दुर्गादेवी
7)मुंजाबा डोंगर(धुरनळी)
छ] नद्या व उगम :
1)मांडवी नदी-उगम-फोपसंडी(अहमदगर)
2)पुष्पावती नदी-उगम-हरिचंद्रगड
3)काळू नदी-उगम-हरिचंद्रगड
4)कुकडी नदी-उगम-कुकडेश्वर
5)मीना नदी-उगम-आंबोली
ज] धरणे :
1)चिल्हेवाडी धरण-मांडवी नदी
2)पिंपळगाव जोगा धरण-पुष्पावती नदी
3)माणिकडोह धरण- कुकडी नदी
4)येडगाव धरण-कुकडी नदी
5)वडज धरण-मीना नदी
झ] खिंडी :
1)गणेश खिंड
2)मढ खिंड
3)आळे खिंड
4)टोलार खिंड
ट] उंच शिखरे :
1) हरिचंद्रगड(१४२४ मीटर) : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोगर शिखर
2) जीवधन
ठ] पठारे :
1)अंबे-हातवीत पठार
2)नळावणे पठार
3)कोपरे-मांडवे पठार
4)अणे पठार
ड] गिर्यारोहकांना आव्हान देणारे उंच कडे :
1) नाणे घाट
2) माळशेज घाट
3) दार्या घाट
4) ढाकोबा
5) दुर्गादेवी
6) हरिचंद्रगड
ढ] नैसर्गिक पूल :
1) अणे घाटातील नैसर्गिक पूल
2) हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पूल
ण] प्रसिद्ध विहिरी :
1) बारव बावडी-जुन्नर
2) पुंदल बावडी-जुन्नर
3) आमडेकर विहीर-पाडळी
त] ऐतिहासिक वास्तु :
1) सैदागर हाबणी घुमट-हापूसबाग
2) ३०० वर्षे जुनी मलिकंबर बाराबावडी पाणीपुरवठा योजना-जुन्नर शहर
3) नवाब गढी-बेल्हे
4)गिब्सन निवास व समाधी
थ] जुन्नर तालुक्यातील दगड घंटेसारखे वाजतात.
1)आंबे गावच्या पश्चिमेस २०० मीटरवर
2)दुर्गादेवी किल्ल्याच्या टॉपवर
द] रांजणखळगे :
1) माणिकडोह गाव-कुकडी नदी
2) निघोज-कुकडी नदी
ध] दहा लाख वर्षांपूर्वीची ज्वालामुखीची राख :
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व संशोधन विभागाने केलेल्या उत्खननात बोरी बुद्रुक व खुर्द या गावांत कुकडी नदीच्या किनाऱ्यावर इंडोनेशियामध्ये दहा लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या राखेचे साठे आढळून आले आहेत. याच ठिकाणी झालेल्या अन्य उत्खननांमध्ये अश्मयुगीन हत्यारे, हस्तिदंत आदी मोलाचे पुरातत्त्वावशेष सापडले आहेत. डेक्कन कॉलेज व बोरी ग्रामपंचायत या सर्व पुरातत्त्वीय ठेव्याचे संरक्षण व संग्रहालय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
न] जागतिक केंद्रे :
1)जागतिक महादुर्बीण-खोडद
2)विक्रम दळणवळण उपग्रह केंद्र-आर्वी
प] कारखाने :
1)कागद कारखाने-जुन्नर
2)विघ्नहर साखर कारखाना-ओझर
3)नवर्निमित कारखाने-जुन्नर तालुका
फ] आशियातील पहिली वायनरी-चाटो इंडेज-चौदानंबर (पुणे-नाशिक हायवेवर)
ब] बिबट्या निवारण केंद्र :
1) माणिकडोह
भ] ३५० वर्षांची परंपरा / इतिहास असलेले आठवडे बाजार :
1) सोमवार-बेल्हा
2) गुरुवार-ओतूर
3) शनिवार-मढ
4) शनिवार-नारयणगाव
5) रविवार-जुन्नर
म] खाद्य संस्कृती :
1) अण्याची आमटी-भाकरी
2) राजूरचा पेढा
3) नारायणगावचा कढीवडा, मिसळ
4) जुन्नरची मासवडी, मटकी भेळ
य] तमाशा पंढरी:नारायणगाव(जुन्नर तालुका) :
तमाशा केंद्र म्हणून नारायणगाव मान मिळाला. प्रसिद्ध तमासगीर :
1) भाऊ बापू मांग नारायणगावकर
2) सौ.विठाबाई नारायणगावकर (राष्ट्रपती पारीतोषिकप्राप्त)
3) दत्ता महाडीक पुणेकर - मंगरुळ पारगाव / बेल्हा
4) मंगला बनसोडे - नारायणगाव
5) मालती इनामदार - नारायणगाव
6) पाडुरंग मुळे मांजरवाडीकर- मांजरवाडी/नारायणगाव
7) दत्तोबा तांबे शिरोलीकर - बोरी शिरोली
8) दगडू पारगावकर - पारगाव तर्फे आळे
र] पुणे जिल्हातील प्पहिले सिनेमागृह :
1)शिवाजी थिएटर-जुन्नर
2)आर्यन थिएटर-पुणे
3) शेवंता थिएटर जुन्नर
४) लक्ष्मी थिएटर नारायणगाव
ल] कलाकार / लेखक:
१) अशोक हांडे - उंब्रज
2) डॉ. अमोल कोल्हे- नारायणगाव
3) नम्रता आवटे/संभेराव
4) शरद जोयेकर-राजुरी
5) मंगेश हाडवळे-राजुरी
6) सुभाष अवचट-ओतूर
7) अनिल अवचट-ओतूर
8) राजन खान-ओतूर
9) दत्ता पाडेकर-आळे
10) शुभांगी लाटकर-राजुरी
11) अंकुश चौधरी-खोडद
12) संजय ढेरंगे - पारगाव तर्फे आळे
13) मनोज हाडवळे - राजुरी
14) लहु गायकवाड - नारायणगाव 15) गोविंद गारे- निमगिरी
16) उत्तम सदाकाळ - मढ
17) सुरेश काळे - मंगर
१८) दिलीप भगत - निमदरी
स्रोत: निसर्गरम्य जुन्नर[३]
जुन्नरचे ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक, धार्मिक, जीवन शैली, खानपान लोकांना कळावे म्हणून येथील “जुन्नर पर्यटन विकास संस्था” कार्यरत आहे. जुन्नरमधील संस्कृती जतनाचे, किल्ले संवर्धनाचे काम “शिवाजी ट्रेल”च्या माध्यमातून सुरू आहे. हचिको टूरिझम ही संस्था तेच काम करत आहे. पराशर कृषी पर्यटन हा त्याचाच एक भाग आहे. "जुन्नर निसर्ग पर्यटन" या फेसबुक पेजच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचा इतिहास व निसर्ग सौंदर्याचे आपण दर्शन घेऊ शकता. जुन्नर तालुक्यातील विविध पर्यटन ठिकाणे कोठे व कोणती आहे याबाबत सविस्तर माहिती पेजवर मांडण्यात आली आहे.
तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नातून २१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रातील पहिला "पर्यटन तालुका" म्हणून घोषित केले.[४]
पुणे जिल्ह्यातील तालुके |
---|
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका |
अकोले तालुका | संगमनेर तालुका | संगमनेर तालुका | ||
मुरबाड तालुका | पारनेर तालुका | |||
जुन्नर तालुका | ||||
आंबेगाव तालुका | शिरूर तालुका |
संदर्भ
- ^ "जुन्नर मतदार संघाची यादी". www.pune.gov.in. pune government.
- ^ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान "Lokmat, a leading Marathi news portal”, Pune, 12-Nov-2021
- ^ "जुन्नर तालुक्यातील निसर्ग खजिना… | निसर्गरम्य जुन्नर…". www.nisargramyajunnar.in. 2022-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-01 रोजी पाहिले.
- ^ "जुन्नर तालुका पर्यटन स्थळ".
पुणे जिल्ह्यातील उत्तरेचा शेती प्रधान तालुका