जुने संसद भवन
भारतामधील राजकारण |
---|
जुने संसद भवन ही भारतीय संसदेची जुनी इमारत आहे. १९१२-१३ साली ब्रिटिश वास्तुकार एडविन लुट्येन्स आणि हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. २०२४मध्ये नवीन संसद भवन बांधल्यावर भारताच्या संसदेच्या बैठका तेथे होतात. इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्चीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीच्या जनपथवरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.
आंबेडकर पुतळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा दिल्लीच्या भारतीय संसद भवनासमोर उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूचा पुतळा आहे. हा पुतळा १५ फुट उंचीचा असून त्याचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत भारताचे संविधान हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.[१]
हा डॉ. आंबेडकर पुतळा बी.व्ही. वाघ यांनी बनवलेला असून २ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्याचे अनावरण झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने हा पुतळा भेट दिला होता.[२]
छायाचित्रे
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित
- ^ http://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp