Jump to content

जुदेआ (रोमन प्रांत)


पहिल्या शतकातील जुदेआ प्रांत

जुदेआ (लॅटिन: Iudæa किंवा Iudaea जुडिया, हिब्रू: יהודה येहुदा ग्रीक: Ἰουδαία) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. या प्रांतामध्ये जुदेआ हा भूप्रदेश तसेच समारिया व इडुमिया हे प्रदेशही समाविष्ट होते. इ.स. १३५ मध्ये सम्राट हाड्रियान याने या प्रांताचे नाव बदलून ते 'सीरिया पॅलेस्टिना' असे केले.