जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था, आंबवणे
स्थापना
ग्रामीण युवतींना व महिलांना सक्षम व सबल करण्याच्या उद्देशाने, स्टरलाईट टेक फाउंडेशन Archived 2017-03-10 at the Wayback Machine. ने पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील आंबवणे या गावी ५ सप्टेंबर २०१४ रोजी 'जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थे'ची स्थापना केली.
कार्यक्षेत्र
जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेत वेल्हे, भोर या तालुक्यांतील एकूण ७६ गावांतील विद्यार्थिनी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात.
सहभागी गट
स्टरलाईट टेक फाउंडेशन व ज्ञान प्रबोधनी संस्था
प्रकल्प
संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची मान्यता असलेले खालील प्रशिक्षण वर्ग घेतले जातात -
- सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिंग केर- हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये ६ महिने थिअरी क्लासेस घेतले जातात तर उरलेल्या ६ महिन्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाकरिता हॉस्पिटलमध्ये जावे लागते. विद्यार्थिनीला महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र मिळत असल्यामुळे तिला नोकरीसाठी पुरेश्या संधी उपलब्ध होतात.
- सर्टिफिकेट कोर्स इन टेलरिंग ॲन्ड कटिंग - हा कोर्स ६ महिने कालावधीचा आहे. हा कोर्स पूर्ण करून महिला अगदी घरीच्या घरी कपडे शिवून, शिवणकाम करून पैसे कमवून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात.
- सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक फॅशन डिझायनिंग - हा कोर्स ६ महिने कालावधीचा आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर युवती व महिला स्वतःचे टेलरिंगचे दुकान सुरू करू शकते किंवा अगदी घरच्या घरी शिवणकाम करू शकते. नोकरी करू शकते.
- सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक ब्यूटी कल्चर - हा कोर्स ६ महिने कालावधीचा असून हा कोर्स पूर्ण केलेल्या युवती व महिला स्वतःचे ब्यूटी पार्लर सुरू करू शकतात. त्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होतात.
- सर्टिफिकेट कोर्स इन मायक्रो साॅफ्ट ऑफिस - हा कोर्स ६ महिने कालावधीचा असून महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र असल्यमुळे सरकारी कार्यालयामध्ये नोकरीची/कामाची संधीही विद्यार्थिनीना मिळू शकते.
- सर्टिफिकेट कोर्स इन डेटा एन्ट्री ऑपरेटर - हा कोर्स ६ महिने कालावधीचा आहे. हा कोर्स पूर्ण करणाऱ्या व विद्यार्थिर्नीना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
युवती व महिला यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थेमध्ये विशेष कार्यशाळा घेतल्या जातात व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
वैशिष्ट्ये
- उच्चशिक्षित महिला प्रशिक्षक
- प्रशस्त जागा
- आधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता
- युवतीना व महिलांना अल्प दरांत प्रशिक्षण
- योगशाळा
- ग्रंथालय
- डेटा प्रोजेक्टरची सोय
कार्यक्रम
- नियमित योगकार्यशाळा
- पोषक आहार
- तज्ज् मार्गदर्शन
- युवती मेळावा
- व्यक्तिमत्त्व विकास शिबीर
- आरोग्य शिबीर
- श्रमदान
- सांस्कृतिक कार्यक्रम
चित्र दालन
- जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था
- सी.सी.इन टेलरिंग ॲन्ड कटिंग वर्ग
- नर्सिंग केर प्रात्यक्षिकनर्सिंग केर प्रात्यक्षिक
- बेसिक ब्यूटी कल्चर प्रात्यक्षिक
- प्रात्यक्षिक वर्ग
- महाराष्ट्र शासनाचा प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम
- जीवनज्योती महिला सक्षमीकरण केंद्रातील शिवण वर्ग
- संगणक वर्ग पोस्टर प्रेझेन्टेशन
बाह्यदुवे
- स्टरलाईट टेक फाउंडेशन Archived 2017-03-10 at the Wayback Machine.
- ज्ञान प्रबोधिनी Archived 2017-05-11 at the Wayback Machine.