जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूट
जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूट ही वैमानिक होण्यासाठीचे बेसिक ट्रेनिंग देणारी भारतातील एक सामाजिक संस्था आहे. निवृत्त विंग कमांडर अनिल गाडगीळ आणि कविता गाडगीळ यांनी ही संस्था स्थापन केली. त्यांचा मुलगा फ्लाइट लेफ्टनन्ट अभिजित याचा मिग विमान अपघातील मृत्यूनंतर हवाई दलात दाखला घेण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याजवळ सिंहगड येथील दोणजे येथे या संस्थेची स्थापना गाडगीळ कुटुंबियांनी केली. देशातला एकमेव असा मोबाइल अत्याधुनिक फ्लाइट सिम्युलेटर द्वारे वैमानिक होण्यासाठीचे मानसिक, बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षण संस्था देते. संस्थेच्या सिम्युलेटरला डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनने प्रमाणित केलं आहे. या मोबाइल फ्लाइट सिम्युलेटर साठी टाटा मोटर्सने संस्थेला ट्रकची चॅसी विनामूल्य दिली आहे.[१][२][३]
भारतीय हवाई दलाने कोणताही खर्च न घेता मिग २१ हे विमान या संस्थेला प्रशिक्षणासाठी दिले आहे.
संदर्भ
- ^ हे मिग धैर्याची प्रेरणा देईल! - कविता गाडगीळ[permanent dead link]
- ^ गगनभरारीच्या आकांक्षांना 'सिम्युलेटर'चे पंख[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ चाकणहून पहिले उड्डाण पाच वर्षांत[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- Jeet Aerospace Institute Archived 2013-09-21 at the Wayback Machine.