जीएन-झेड११ (GN-z11)
जीएन-झेड११ (GN-z11) | |
---|---|
GOODS-उत्तर सर्व्हेच्या छायाचित्रावर अध्यारोपित केलेले GN-z11 दीर्घिकेचे छायाचित्र | |
निरीक्षण डेटा (J2000[१] युग) | |
तारकासमूह | सप्तर्षी |
राईट असेंशन | १२h ३६m २५.४६s[१] |
डेक्लिनेशन | +६२° १४′ ३१.४″[१] |
रेडशिफ्ट | ११.०९[२] |
अंतर (प्रकाशवर्ष) | ~३.२×१०१० प्रकाशवर्ष |
प्रकार | दीर्घिका |
वस्तुमान | ~१०×१०९ M☉ |
संदर्भ: [१] | |
जीएन-झेड११ (GN-z11) ही सप्तर्षी या तारकासमूहातील एक उच्च-रेडशिफ्ट दीर्घिका आहे. ती सध्या (२०१६ साली) जगाला माहीत असलेली दृश्य विश्वातील सर्वात दूर अंतरावरील दीर्घिका आहे.[३] तिचा रेडशिफ्ट (z) ११.०९ इतका आहे, याचा अर्थ ही दीर्घिका पृथ्वीपासून ३२ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[४][टीप १] GN-z11 या दीर्घिकेला ती १३.४ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे महास्फोटानंतर फक्त ४० कोटी वर्षांनंतर जशी अस्तित्वात होती तशी पाहण्यात आली आहे.[२]
शोध
या दीर्घिकेचा शोध हबल दुर्बिणीचा CANDELS सर्व्हे आणि स्पिट्झर अवकाश दुर्बिणीचा GOODS-उत्तर सर्व्हे यांच्या डेटांच्या अभ्यासातून लागला.[५][६] संशोधन गटाने हबलच्या वाइड फील्ड कॅमेरा ३चा वापर करून पंक्तिदर्शन तंत्र वापरून, म्हणजे प्रकाशातील घटक रंग वेगळे करून त्यापासून विश्वाच्या प्रसरणामुळे निर्माण होणारा रेडशिफ्ट मोजून GN-z11 पर्यंतचे अंतर मोजले.[७]
ही दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा २५ पटीने लहान आहे. तिचे वस्तुमान आकाशगंगेच्या वस्तुमानाच्या १ टक्का असूनही ती नवीन ताऱ्यांची निर्मिती आकाशगंगेच्या २० पट वेगाने करत आहे.[७] विश्वातील सर्वात पहिले तारे निर्माण होण्याच्या काळात एवढ्या वस्तुमानाची ही दीर्घिका अस्तित्वात होती ही गोष्ट दीर्घिका निर्मितीच्या सैद्धान्तिक मॉडेलांसाठी एक आव्हान आहे.[७]
टीप
- ^ आपल्या विश्वाचे वय १३.८ अब्ज वर्षे आहे. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर असते आणि विश्वातील कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकत नाही. या सर्व कारणांमुळे ३२ अब्ज प्रकाशवर्षे हे अंतर प्रथमकल्पनी चुकीचे वाटू शकते. पण विश्व प्रसरण पावत असल्यामुळे GN-z11 पासून निघालेल्या प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागलेल्या १३.४ अब्ज वर्षांमध्ये त्याने कापलेले १३.४ अब्ज प्रकाशवर्षांचे अंतर प्रसरण पावून ३२ अब्ज प्रकाशवर्षे झाले आहे.
संदर्भ
- ^ a b c d "हबल टीम ब्रेक्स कॉस्मिक डिस्टन्स रेकॉर्ड - फास्ट फॅक्ट (Hubble Team Breaks Cosmic Distance Record - Fast Facts)" (इंग्रजी भाषेत). १० मार्च, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b Oesch, P. A.; Brammer, G.; van Dokkum, P.; et al. (March 1, 2016). "A Remarkably Luminous Galaxy at z=11.1 Measured with Hubble Space Telescope Grism Spectroscopy" (इंग्रजी भाषेत). arXiv:1603.00461. Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ क्लॉट्झ, आयरिन. "हबल स्पाइज् मोस्ट डिस्टंट, ओल्डेस्ट गॅलॅक्सी एव्हर (Hubble Spies Most Distant, Oldest Galaxy Ever)". Discovery News (इंग्रजी भाषेत). 2019-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "ॲस्ट्रॉनॉमर्स स्पॉट मोस्ट डिस्टंट गॅलॅक्सी-ॲट लीस्ट फॉर नाऊ (Astronomers Spot Most Distant Galaxy—At Least For Now)". १० मार्च, २०१६ रोजी पाहिले.
Yep, it took 13.4 billion years for light from the galaxy to zoom through the universe and collide with the Hubble Space Telescope. But that doesn’t mean the galaxy is 13.4 billion light-years away. The universe has been expanding in the meantime, meaning GN-z11 is actually much, much farther from Earth than that.
“Right now, we expect this galaxy to be about 32 billion light-years away from us in distance,” says study coauthor Pascal Oesch of Yale University.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "हबल ब्रेक्स कॉस्मिक डिस्टन्स रेकॉर्ड (Hubble breaks cosmic distance record)" (इंग्रजी भाषेत). heic1604. 2016-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 3, 2016 रोजी पाहिले.
- ^ "हबल टीम ब्रेक्स कॉस्मिक डिस्टन्स रेकॉर्ड - फुल (Hubble Team Breaks Cosmic Distance Record - Full)" (इंग्रजी भाषेत). STScI-2016-07. March 3, 2016 रोजी पाहिले.
- ^ a b c "शॅटरिंग द कॉस्मिक डिस्टन्स रेकॉर्ड, वन्स अगेन (Shattering the cosmic distance record, once again)" (इंग्रजी भाषेत). March 4, 2016 रोजी पाहिले.