Jump to content

जी.आर. गोपीनाथ

गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ
जन्म गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ
१३ नोव्हेंबर, १९५१ (1951-11-13) (वय: ७२)
गोरुर, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा व्यवसायिक
ख्याती एर डेक्कनचे संस्थापक

गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ एक भारतीय उद्योजक आहेत, एर डेक्कनचे संस्थापक, सेवानिवृत्त भारतीय लष्कराचे कॅप्टन, लेखक आणि एक राजकारणी आहे.

जन्म आणि पार्श्वभूमी

गोपीनाथ यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५१ रोजी गोरूर (कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एक दुर्गम गाव) मध्ये झाला. त्यांना ८ भावंडे होती त्यातील ते दुसरे होते. गोपीनाथांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. शाळेच्या प्रणालीवर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी गोपीनाथ यांना घरीच शिकवले. त्यानंतर गोपीनाथ हे कन्नड माध्यमिक शाळेत दाखल झाले. १९६२ मध्ये यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली व सैनिक स्कूल, बिजापूर येथे प्रवेश घेतला. सैनिकी शाळेने गोपीनाथ यांना उत्तीर्ण व्हावे म्हणून मदत केली. ३ वर्षाचा कठोर प्रशिक्षणानंतर गोपीनाथ यांनी एनडीए मधून शिक्षण घेतले. त्यानंतर ते आयएमएम मधून शिक्षण घेतले.

कारकीर्द

शाळेनंतर त्यांनी भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन रॅंक मिळवला. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धामध्ये ते कॅप्टन होते. त्यानंतर त्यांनी २८ व्या वर्षी लष्करातून लवकरच निवृत्ती स्वीकारली. लष्करातून निवृत्ती नंतर त्यांनी पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत शेतीची स्थापना केली. १९९६ मध्ये त्यांच्या अभिनव पद्धतीमुळे त्यांना रोलएक्स लॉरेटचा पुरस्कार दिला. पुढे त्यांनी मालनाब मोटारबाईक (एन्फिल्ड बुलेट डीलरशिप) सुरू केली आणि हसनमध्ये एक उडपी हॉटेलही उघडले.

१९९७ साली त्यांनी डेक्कन एव्हिएशन ही सहकारी संस्था बनली. २००३ मध्ये गोपीनाथ यांनी एर डेक्कनची स्थापना केली. एर डेक्कनचे २००७ मध्ये किंगफिशर एरलाइन्सचे विलीनीकरण झाले.

२००९ मध्ये त्यांनी फ्रेट फ्लाइट व्यवसायासाठी डेक्कन ३६०ची स्थापना केली. २००९ मध्ये गोपीनाथ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढले मात्र अपयशी झाले. २०१४ मध्ये, आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी अयशस्वीपणे लोकसभा निवडणूक लढविली.

पुरस्कार आणि सन्मान

  • १९९६ - एंटरप्राइजसाठी रोलेक्स पुरस्कार
  • २००५ - राजोत्सव पुरस्कार (कर्नाटक)
  • २००७ - शेव्हिएरि डेला लीजीयन डी'ऑनरुर (फ्रान्स)
  • पद्मशक्तीचा दिवाण पुरस्कार (केजी फाऊंडेशन)
  • सर एम विश्वेश्वरय्या मेमोरियल पुरस्कार (फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री)

संदर्भ