जिव्या सोमा म्हसे
वारली चित्रकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १९, इ.स. १९३४ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. २०१८ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
जिव्या सोमा मशे(जन्म : १९ मे इ.स.१९३४; - १५ मे इ.स.२०१८) हे एक मराठी चित्रकार व कलाकार होते. त्यांनी वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ते पहिले आदिवासी कलावंत आहेत.[१] वारली जमातीत प्रामुख्याने महिलांची कला म्हणून ओळखला जाणारा हा कलाप्रकार म्हसे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आत्मसात केला.[२]
जीवन
पालघर भागातील आदिवासींचे वास्तव्य असलेल्या डहाणू तालुक्यातील गंजाड या गावात त्यांचे वास्तव्य होते.
योगदान
कलात्मक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कलाकारांना संधी मिळावी या उद्देशाने भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोहीम सुरू केली. या मोहिमेत भास्कर कुलकर्णी यांची जिव्या सोमा म्हसे यांच्याशी ओळख झाली, आणि म्हसे यांच्या निमित्ताने वारली चित्रकला समाजासमोर आली.
पारंपरिक वारली चित्रांमध्ये म्हसे यांनी प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, फूल, फळ अशा निसर्गचित्रांना स्थान मिळवून दिले, हे त्यांचे योगदान म्हणून सांगता येईल.[१]
पद्मश्री पुरस्कार
वारली चित्रकलेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल भारत सरकारने त्यांना इ.स. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.[३] इ.स.१९७६ साली म्हसे यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अन्य सन्मान
भारतासह जर्मनी, रशिया, जपान, इटली, इंग्लंड, चीन, बेल्जियम या देशांमध्ये म्हसे यांनी आपली कला सादर केली आहे. बेल्जियमच्या राणीने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. जपानमधील मिथिला म्युझियमचे संचालक होसेगवा यांच्या हस्तेही म्हसे यांचा गौरव करण्यात आला आहे.
बाह्य दुवे
- [१]
- Jivya Soma Mase's Page Archived 2012-03-24 at Archive.is
- Jivya Soma Mashe Blog
- Jivya Soma Mashe a legendary Warli artist Archived 2007-10-06 at the Wayback Machine.
- Nek Chand — Jivya Soma Mashe, Halle Saint Pierre, Paris
- Warli Art Home Page
- अादिभारतीय परंपरेतला कलाधर्मी https://www.loksatta.com/lekha-news/artist-jivya-soma-mashe-1682967/
- [२]
संदर्भ
- ^ a b "महाराष्ट टाइम्स". आदिवासी कलेतील अस्सल हिरा. १६/५/२०१८.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "वारलीचे जनक पद्मश्री जिव्या म्हसे काळाच्या पडद्याआड | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2018-05-16 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ पवार, श्वेता. "वारली चित्रकलेचा जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे निधन | Saamana (सामना)". www.saamana.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-16 रोजी पाहिले.
४. https://www.loksatta.com/lekha-news/artist-jivya-soma-mashe-1682967/[१]
- ^ "आदिभारतीय परंपरेतला कलाधर्मी". Loksatta. 2018-05-20. 2018-05-20 रोजी पाहिले.