Jump to content

जिन्सन जॉन्सन

जिन्सन जॉन्सन

जिन्सन जॉन्सन ( 15 मार्च 1991) हे ८०० आणि १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारातील भारतीय धावपटू आहेत. . २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील 800 मीटर स्पर्धेत त्याने भाग घेतला. २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी बहादूर प्रसादचा 23 वर्षांचा रेकॉर्ड मोडत 1500 मीटर शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे. नंतर त्याच वर्षी, इंडोनेशियाच्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तसेच ८०० मीटर प्रकारात रौप्य पदक जिंकले.

सुरुवातीचे जीवन

जॉन्सनचा जन्म [] 15 मार्च १९९१ [] रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील चक्कितपारा शहरात झाला. त्यांनी कुलथुवायल येथील सेंट जॉर्ज हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि कोट्टायममधील बॅसिलियस महाविद्यालयात पदवी घेतली. २००९ मध्ये भारतीय सैन्यात भरती होण्यापूर्वी त्यांनी कोट्टायममधील केरळ क्रीडा परिषदेच्या क्रीडा वसतिगृहात प्रशिक्षण घेतले.

कारकीर्द

२०१५: जॉन्सन यांनी वुहान येथे मध्ये झालेल्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 800 मीटर स्पर्धेत 1: 49.69च्या वेळेसह रौप्यपदक जिंकले. त्याचवर्षी त्याने थायलंडमध्ये एशियन ग्रँड प्री येथे तीन सुवर्ण पदके जिंकली.

२०१६: जॉन्सन यांनी जुलै २०१६ मध्ये बंगळुरू येथे वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत ऑलिम्पिक पात्रतेचा मान मिळवून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील 800 मीटर स्पर्धेसाठी पात्र ठरले.

२०१८: जून २०१८ मध्ये जॉन्सन यांनी ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारातील श्रीराम सिंग यांचा दीर्घकाळचा राष्ट्रीय विक्रम मोडला.

२०१८: २०१८ आशियाई खेळांमध्ये त्यांनी 1500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि 800 मीटर मध्ये रौप्य पदक जिंकले.

संदर्भ

  1. ^ a b https://web.archive.org/web/20160806070959/https://www.rio2016.com/en/athlete/jinson-johnson. 6 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Missing or empty |title= (सहाय्य)