जितेंद्र त्यागी
जितेंद्र नारायण सिंग त्यागी | |
---|---|
जन्म | सय्यद वसिम रिझवी लखनौ, उत्तर प्रदेश |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | वक्ता, चित्रपट निर्माता,[१] राजकारणी |
ख्याती | भारतातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी सदस्य आणि अध्यक्ष |
कार्यकाळ | १९९५ - २०२० |
पूर्ववर्ती | समाजवादी पक्ष |
धर्म | मुस्लिम(पूर्ववर्ती), हिंदू(धर्मांतरित) |
जितेंद्र नारायण सिंह त्यागी हे पूर्वी सय्यद वसिम रिझवी म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेश, भारतातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी सदस्य आणि अध्यक्ष होते.[२] त्यांनी ६ डिसेंबर २०२१ रोजी दासना मंदिर, गाझियाबादचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात धर्मांतरण केले.[३] भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी, तसेच राम की जन्मभूमी या बॉलीवूड चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी ते ओळखले जातात.[४][५][१]
राजकीय कारकीर्द
त्यागी (पूर्ववर्ती रिझवी) हे रेल्वेतील तिसऱ्या वर्गातील मुस्लिम समाजातील कर्मचाऱ्याचा घरी जन्माला आले. त्यागी सहाव्या वर्गात शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यागी आणि त्यांच्या भावंडांची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. त्यागी आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी नैनिताल येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला.[६][७]
यानंतर ते सौदी अरेबियाला गेले आणि एका हॉटेलमध्ये सफाईचे काम करू लागले. नंतर त्यांना जपानला जाण्याची संधी मिळाली आणि तिथे त्यांनी एका कारखान्यात काम केले. यानंतर त्यांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली जिथे त्यांनी एका दुकानात काम केले.[६][७]
सामाजिक आणि राजकीय कारकीर्द
इस २००० मध्ये लखनौमधील जुन्या शहरातील काश्मिरी मोहल्ला प्रभागातून ते समाजवादी पक्षाचे (स.पा.) नगरसेवक म्हणून निवडून आले आणि इस २००८ मध्ये शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. जवळपास दहा वर्षे ते या बोर्डावर अध्यक्ष म्हणून काम करत होते[८][७] इस २०१२ मध्ये, शिया धर्मगुरू 'कल्बे जवाद' यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यागी यांना सहा वर्षांसाठी समाजवादी पक्षातुन काढून टाकण्यात आले. याचे कारण म्हणजे त्यांच्यावर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.[९] त्यागी यांना नंतर न्यायालयातून दिलासा मिळाला आणि त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.[२]
राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद वादात त्यागी (पूर्वाश्रमीचे रिझवी) हे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष या नात्याने एक मुस्लिम पक्षकार होते. कोर्टाबाहेर वाद मिटवण्यासाठीच्या चर्चेत भाग घेताना त्यागी यांना वारंवार धमक्या मिळत असत. पाकिस्तान स्थित अतिरेकी संघटना 'जमात-ए-इस्लामी' यांनी त्यांना त्यांच्या विपत्र पत्त्यावर म्हणजे ई-मेल वर पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती.[१०] पाकिस्तान स्थित फरारी गुन्हेगार दाऊद इब्राहिम याने १३ जानेवारी २०१८ रोजी फोन द्वारे जिवे मारण्याची धमकी दिली होती.[११] तद्नंतर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांनी आपल्या हस्तकांच्या मदतीने त्यांच्या हत्येचा कट रचला होता. या प्रकरणाची चौकशी करून दिल्ली पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून एकूण चार गुन्हेगारांना अटक केली होती.[१२]
इस २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याची घोषणा झाली तेव्हा त्यागी यांनी वैयक्तिक रित्या राम मंदिर निर्माण समितीला एक्कावन हजार रुपये देणगी देण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी या निकालानंतर आता कोणताही वाद उरला नसून उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्ड राम मंदिराचे समर्थन करणार आहे. भविष्यात जेव्हाही राम मंदिर बांधले जाईल तेव्हा शिया वक्फ बोर्डाकडून मदत केली जाईल, असे प्रेस नोट द्वारे घोषित केले.[१३]
वादविवाद
जानेवारी २०१८ मध्ये, त्यागी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहून मदरसे रद्द करण्याची मागणी केली आणि म्हणले की त्यातील काही मदरसे मुस्लिमांच्या भल्यासाठी काम करण्या ऐवजी दहशतवाद्यांचे निर्माते म्हणून काम करतात.[९] याला प्रत्युत्तर म्हणून, बरेली आधारित धार्मिक संघटना ऑल इंडिया फैझान-ए-मदिना कौन्सिल (एआयएफएमसी) ने त्यागीचा शिरच्छेद करणाऱ्या प्रत्येकासाठी १०,००,७८६ रुपयांचे इनाम आणि मोफत हज यात्रा जाहीर केली.[१४]
यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये, त्यागी म्हणाले की भारतातील मदरशांमध्ये समलैंगिकता प्रचलित आहे.[१५]
'मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास आत्महत्या करणार' इ.स. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यागी यांनी वार्ताहरांना मुलाखत देताना असे म्हणले की, जर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा परत निवडून आले नाही तर ते राम मंदिराच्या दारात जाऊन आत्महत्या करतील. मोदी हे कुशल पंतप्रधान असून राष्ट्रहिताची बाजू म्हणून ते मोदींना समर्थन करतात. याकाळात त्यागी उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट होता. यामुळे हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला.[१६]
जानेवारी २०२० मध्ये त्यागी म्हणाले की, "काही लोकांचा असा विश्वास आहे की मुलं जन्माला घालणे ही दैवी (नैसर्गिक) प्रक्रिया आहे आणि त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये. अधिकाधिक लेकरांना जन्माला घालणे हे समाज आणि देश दोन्हीसाठी हानिकारक आहे. तेव्हा लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केल्यास देशासाठी चांगले होईल."[१७]
एका मुलाखतीत त्यांनी म्हणले की त्यांना स्वतःला मुस्लिम म्हणवून घेणे आवडत नाही, ज्यामुळे त्यांना "क्रूर, जंगली श्वापद" असल्यासारखे वाटते. त्यागी पुढे म्हणाले की ते चांगले मुस्लिम आहेत, परंतु जर त्यांना तालिबानच्या समान वर्गात ठेवायचे असेल तर, त्या ऐवजी माणूस म्हणून ओळख देणे अधिक योग्य राहील.[१८] दुसऱ्या एका मुलाखतीत त्यांनी जाहीर केले की त्यांनी इस्लामचा त्याग केला आहे.[१९]
जितेंद्र त्यागी (वसीम रिझवी) यांची काही प्रसिद्ध विधाने
- मुस्लिमांनी देशातील नऊ वादग्रस्त मशिदी हिंदूंच्या ताब्यात द्याव्यात.[२०][९]
- बाबरी रचना ही हिंदुस्थानच्या भूमीला लागलेला एक कलंक आहे.[२१]
- चंद्र आणि तारा असलेला हिरवा झेंडा हा इस्लामचा धार्मिक ध्वज नाही, असे रिझवी म्हणाले. हा झेंडा पाकिस्तानचा राजकीय पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीगसारखा आहे. हा झेंडा फडकावणाऱ्यांवर कारवाई करावी. रिझवी म्हणाले की, मुहंमद पैगंबर पांढरा किंवा काळा ध्वज वापरत असत.[२२]
- मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास आत्महत्या करणार.[१६]
- इस्लामिक मदरसे दहशतवादाला प्रोत्साहन देतात म्हणून बंद केले पाहिजेत. काही मदरशांमध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते. येथे आधुनिक शिक्षण दिले जात नाही.[११]
- पशुवत मुले निर्माण करून राष्ट्राचे नुकसान - जानेवारी २०२० मध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या संभाव्य कायद्याचे समर्थन करताना त्यागी म्हणाले, काही लोकांचा असा विश्वास आहे की मुलांचा जन्म नैसर्गिक आहे आणि त्यात छेडछाड केली जाऊ नये. पण अनेक मुलांना जन्म देणं हे समाज आणि देशासाठी अत्यंत घातक आहे. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला तर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे अधिक चांगले होईल.[२३]
- कुराणातील २६ श्लोक हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - मार्च २०२१ मध्ये त्यागी यांनी कुराणातील २६ श्लोक हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यागी यांनी आपल्या याचिकेत कुराणच्या या आयती नंतर घुसडण्यात आली आहेत.[२४][२५]
याचिका
१२ मार्च २०२१ रोजी त्यागिनीं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, जिथे त्याने कुराणातील २६ श्लोक काढून टाकण्याचे आवाहन केले.[२६] त्यांनी याचिकेत दावा केला आहे की या वचनांमुळे मुस्लिमांमध्ये हिंसाचार वाढतो.[२७] याचिकेत म्हणले आहे की या २६ श्लोक मूळ कुराणचा भाग नसून नंतरच्या टप्प्यावर टाकण्यात आले होते.[२८] प्रतिसादात, इस्लामच्या शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथांच्या मुस्लिम संस्थांकडून निषेध करण्यात आला आहे.[२९][३०] एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावर उत्तर देत असे म्हणले की वसिम रिझवी हा सर्वात मोठा जोकर आहे, संधीसाधू आहे. त्यांनी आपला आत्मा आरएसएसला विकला आहे. मी या भोंदूला आव्हान देतो की शिया, सुन्नी किंवा मदरसा जिथे अशा शिकवणी दिल्या जातात ते दाखवावे. जर त्याच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी जाऊन गृहमंत्र्यांना दाखवावे. अनेक संघटनांनी त्यागीच्या अटकेची मागणी केली आहे.[३१] मुरादाबादमधील एका वकिलाने रिझवी उर्फ त्यागीचा शिरच्छेद करणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तर उत्तर प्रदेशातील 'शियाने हैदर-ए-करार वेल्फेअर असोसिएशन' या मुस्लिम संघटनेने रिझवीचा शिरच्छेद करणाऱ्यास २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.[९]
धर्मांतरण
मुस्लिम समाजातील रोष आणि धर्मातून बहिष्कृत केल्या नंतर त्यागी (पूर्वाश्रमीचे रिझवी) यांनी हिंदू धर्मात धर्मांतरण करण्याची अधिकृत घोषणा केली. यापूर्वीच मुस्लिम समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला तेव्हा त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहून ठेवले, ज्यात त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने दहन करून करावा आणि या विधीचे अधिकार त्यांनी नरसिंहानंद गिरी महाराज यांना असतील अशी नोंद केली.[३२]
६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी साडे दहा वाजता उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथील डासना देवी मंदिरात यती नरसिंहानंद गिरी महाराज यांच्या हस्ते त्यांनी धर्मांतरण केले. यावेळेस यती नरसिहनांद गिरी महाराज यांनी त्यांचे नाव 'जितेंद्र नारायणसिंह त्यागी' असे ठेवले. धर्मांतरणानंतर त्यागी म्हणले,
आपण आपल्या इच्छेनं हिंदू धर्मात प्रवेश करत आहोत, हिंदू धर्मात प्रवेश ही माझी घरवापसी आहे. इथं धर्म परिवर्तनाची कोणतीही बाब नाही. ज्यावेळी मला मुस्लिम धर्मातून काढलं त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. सनातन धर्म हा जगातील सर्वात पहिला धर्म आहे. या धर्मात असणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी इतर धर्मांमध्ये नाहीत.
ग्रंथ सूची
- मोहम्मद - नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्यागी (पूर्वाश्रमीचे रिझवी) यांनी इस्लाम का आला आणि त्यागी इस्लामला हिंसक धर्म का मानतात यावर आपला दृष्टिकोन मांडला आहे. पुस्तक लिहिताना त्यांनी तब्बल ३५० 'इस्लामिक पुस्तकांचा' संदर्भ दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.[३४][३५]
संदर्भ
- ^ a b "UP Shia Board chief Waseem Rizvi scripts, produces film on Ram temple". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-11-20. 2019-12-26 रोजी पाहिले.
- ^ a b Dhingra, Sanya (19 January 2018). "Waseem Rizvi". ThePrint. 19 March 2021 रोजी पाहिले.
- ^ Ojha, Arvind (6 December 2021). "Former UP Shia Waqf Board chief Waseem Rizvi converts to Hinduism". India Today.
- ^ "Shia Waqf Board chief Waseem Rizvi's movie on Ayodhya to release next month". The New Indian Express. 2019-12-26 रोजी पाहिले.
- ^ "Waseem Rizvi Films distances from 'Aisha' teaser, claims it to be doctored". www.aninews.in (इंग्रजी भाषेत). 2019-12-26 रोजी पाहिले.
- ^ a b "Wasim Rizvi : वसीम रिझवींनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म, काय आहे कारण, कोण आहेत रिझवी?". एबीपी माझा. 2021-12-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-12-06 रोजी पाहिले.
- ^ a b c "Waseem Rizvi: '9 मस्जिदें हिंदुओं को सौंपें', 'जय श्रीराम' से कुरान तक... कौन हैं वसीम रिजवी जिन पर यूपी में उबाल". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2021-03-16 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "कौन हैं वसीम रिजवी, जिन्होंने बार-बार की अयोध्या में राम मंदिर बनाने की वकालत". अमर उजाला. 10 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 January 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Who is Wasim Rizvi". The Indian Express. 18 March 2021. 19 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "शिया सेंट्रल वक्फ बोर्ड अध्यक्ष रिजवी को पाकिस्तानी आंतकी संगठन ने दी जान से मारने की धमकी". 2021-12-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "कौन हैं शिया वक्फ़ बोर्ड के चेयरमैन, जिन्हें दाऊद ने बम से उड़ाने की धमकी दी है". thelallantop (हिंदी भाषेत). 2019-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-06 रोजी पाहिले.
- ^ "राम मंदिर का समर्थन करने वाले शिया वक्फ बोर्ड के अध्यक्ष की हत्या कराना चाहता है दाऊद! साजिश रचने वाला चौथा व्यक्ति गिरफ्तार" (हिंदी भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2021-12-08. ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "राम मंदिर निर्माण के लिए इस मुस्लिम नेता ने की 51 हजार रुपये देने की घोषणा" (हिंदी भाषेत). ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Muslim outfit places Rs 10 lakh bounty on Shia Waqf Board chief's head". Hindustan Times. 16 January 2018.
- ^ Qureshi, Siraj (8 September 2018). "Muslim clerics announce expulsion of Shia Waqf chief Waseem Rizvi from Islam". India Today. 19 March 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास आत्महत्या करणार: रिझवी". महाराष्ट्र टाइम्स. 2021-12-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "'Giving birth to children like animals harmful for country': UP Shia Waqf Board chairman". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 21 January 2020.
- ^ Wasim Rizvi Exclusive Interview at Mohammad Book Launch Ceremony| Yati Narsinghanand | Vishalviews (इंग्रजी भाषेत), 2021-11-13 रोजी पाहिले
- ^ Why I chose Sanatan and left Mohammedanism? Syed Waseem Rizvi (इंग्रजी भाषेत), 2021-11-27 रोजी पाहिले
- ^ "वसीम रिजवी ने 9 विवादित मस्जिदों को हिंदुओं को सौंपने की मांग की". Aajtak.intoday.in. 10 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "वसीम रिजवी बोले, हिंदुस्तान की जमीन पर कलंक की तरह है बाबरी ढांचा". aajtak.intoday.in. 10 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "इस्लामिक झंडे पर किया था कमेंट, वसीम रिजवी को मिली जान से मारने की धमकी". जनसत्ता. 10 January 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 January 2019 रोजी पाहिले.
- ^ वसीम रिजवी बोले- जानवरों की तरह बच्चे पैदा करना देश के लिए हानिकारक
- ^ वसीम रिजवी ने कुरान की 26 आयतों को हटाने के लिए सुप्रीम कोर्ट में दाखिल की जनहित याचिका
- ^ कुरान की आयातों के हटाने के समर्थन में उतरी हिन्दू महासभा
- ^ "Shia Body Blasts Waseem Rizvi For Anti Quran Move". Kashmir Observer. 12 March 2021. 12 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Supreme Court se Kuran ki kucch ayatein hatane ki maang". Dainik Jagran. 15 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Petition in SC over Quran triggers storm: UP's Waseem Rizvi says 26 verses not part of the original holy book". Times of India. 16 March 2021. 19 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Shias & Sunnis rally against Waseem Rizvi's plea on Quran verses". Times of India. 15 March 2021. 22 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "PIL by Shia board's former chief on Quran verses draws massive backlash". Indian Express. 15 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Shia, Sunni scholars demand arrest of Shia Wakf Board chairman Waseem Rizvi". The Siasat Daily - Archive. 11 January 2018.
- ^ "शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी आज स्वीकारणार हिंदू धर्म". ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Wasim Rizvi : शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष Wasim Rizvi यांनी स्वीकारला हिंदू धर्म, नेमकं कारण काय?". झी न्यूझ. 2021-12-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ Wasim Rizvi (7 November 2021). "Controversy over Waseem Rizvi's book 'Mohammed' - Watch One Minute One News" (Hindi भाषेत). Zee News. 8 November 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Lucknow: Wasim Rizvi created a new controversy by writing a book 'Mohammed' on the life of the Prophet, got it released by Mahant Yeti". Amar Ujala. 8 November 2021.