जिंतूर विधानसभा मतदारसंघ
जिंतूर विधानसभा मतदारसंघ - ९५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जिंतूर मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सैलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाच्या मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर ह्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | विजय माणिकराव भांबळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | रामप्रसाद वामनराव कदम-बोर्डीकर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
जिंतूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रामप्रसाद बोर्डीकर | काँग्रेस | ७६,४२७ |
विजय माणिकराव भांबले | अपक्ष | ७५,२०२ |
हरीभाऊ विठ्ठलराव लहाने | शिवसेना | ३०,५७६ |
सुधाकर उमाजी साळवे | अपक्ष | ३,३३३ |
शेख सलीम शेख लतीफ पहेलवान | रासप | २,४७७ |
योगीराज सावळाराम वाघमारे | बसपा | १,८९४ |
सय्यद अनवर सय्यद इसा | अपक्ष | १,४९५ |
सय्यद दिलावर सय्यद जमाल | अपक्ष | १,४२९ |
रावण देवजी मोहिते | हिंदुस्तान जनता पक्ष | ९६६ |
डॉ के.जे. देशमुख माजी सैनिक | अपना दल | ९४६ |
शेख सरफराज अब्दुल मैजद | आंनॅकॉं | ५६० |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जिंतूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.