जिंतूर
?जिंतूर महाराष्ट्र • भारत | |
— दूर्गम भाग तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | जिंतूर |
पंचायत समिती | जिंतूर |
जिंतूर हे महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे गाव पूर्वी जिनपूर नावाने ओळखले जाई. शहरालगत नेमगिरी हे जैन तीर्थस्थान असून तेथे तीर्थंकर नेमिनाथाची प्राचीन मूर्ती आहे. जिंतूरपासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे. जिंतूर शहरा पासून ३० किमी अंतरावर येलदरी धरण आहे, जींतुर जालना हायवेवरून गणेशपुर फाट्यावरून 14 किमी वर धानोरा बुद्रुक हे गाव आहे तेथे जागृत खंडोबाचे अती प्राचीन मंदिर आहे सोबत दीप माळ व बारव आहे दर वर्षी पंचक्रोशीतील भाविक खुप मोठया प्रमाणात या ठीकाणी दर्शनासाठी येत आसतात या गावात भामटी, ब्राम्हण, मराठा ईत्यादी. जाती धर्मातील लोक खुप काळापासून मोठया गुन्या गोवीदाने व एकोप्याने राहतात.
तालुक्यातील गावे
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते ऑक्टोबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.