जाॅन विक्लिफ
जॉन विक्लिफ (इ.स. १३२० ते इ.स. १३८४) यांना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीचा आद्यप्रणेता मानले जाते. ते धर्मसंस्थेवर टीका करणारे व धर्मसुधारणा चळवळ सुरू करणारे पहिले विचारवंत होते. म्हणून त्यांना धर्मसुधारणा चळवळीचा 'शुक्रतारा' मानले जाते.
कार्य
जाॅन विक्लिफ इंग्लंडमधल्या आॅक्सफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी लॅटीनमधल्या बायबलचे सोप्या इंग्रजीत भाषांतर करून तो ग्रंथ सर्वसामान्यांपर्यत पोचवला. पोपचा अधिकार न मानता बायबलातील आदेश मानने त्यातच खरा धर्म आहे याची जाणीव त्यांनी लोकांना जाणीव करुण दिली. त्यांनी गरीब धर्मोपदेशकांचा एक संघ स्थापन केला. त्यांनी पोपच्या अनियंत्रीत सत्तेविरूद्ध चळवळ सुरू केली. तसेच धार्मिक अंधश्रद्धेवर टीका केली. त्यांच्या या विद्रोहामुळे त्यांना आॅक्सफोर्ड विद्यपीठातील नोकरी गमवावी लागली. इ.स. १३८४ त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे प्रेत उकरून काढून उकिरड्यावर टाकले गेले.