जावेद कुरैशी
जावेद पाशा कुरैशी यांचा जन्म गडचिरोलीत १२ जानेवारी १९६२ ला झाले.[१] गडचिरोली जिल्यातील आदिवासीबहुल, अठरापगड़ जातीच्या गावात त्याचे पालनपोषण झाले. त्यांचे वडील अब्दुल गणी अब्दुल कादिर क़ुरैशी हे महसूल विभागात नोकरीला होते.[ संदर्भ हवा ]
जावेद कुरैशी हे सूफी-संतवादी विचारांचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरीच्या आश्रमात झाले . जावेद पाशा कुरैशी सध्या नागपूरमध्ये राहतात.[ संदर्भ हवा ] जावेद पाशा कुरैशी मुस्लिम मराठी लेखक आहेत. परन्तु फुले-शाहू-आम्बेडकरी विचारधारेचे व आन्दोलनाचे मान्यवर आहेत. त्यांनी विविध विषयावर आत्तापर्यत ३8 पुस्तके लिहिली आहेत. ते भारतीय मुस्लिम परिषद या सामाजिक, राजकीय प्रबोधनवादी संघटनेचे अध्यक्ष आहेत! त्यांना आतार्यन्त 236 विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.[ संदर्भ हवा ]
ते उत्कृष्ठ कलावंत असून अनेक गाजलेली नाटके सादर केलेली आहेत. नाट्य लेखक, दिग्दर्शक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्रात उत्कृष्ट वक्ते, प्रबोधनकार विविध आन्दोलनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात! मुस्लिम साहित्य चळवळ, मुस्लिम ओबीसी चळवळीचे ते प्रणेते आहेत. मुस्लिम आरक्षण[२] व मुसलमानांच्या जातिव्यवस्थेवर त्यांचा सखोल अभ्यास आहे.[३]
प्रकाशित ग्रंथ [ संदर्भ हवा ]
- औरंगजेब आणि जोशी
- बएत
- फुले-शाहू-गांधी-आम्बेडकर का
ब्राम्हणी राष्ट्रवाद से संघर्ष!
- नारंगी जुलूस
- बहुजनांचा इस्लाम स्वीकारण्याचा सामाजिक इतिहास
- दंगलग्रस्त मुस्लिम मानसिकता
- इस्लाम, डॉ. आम्बेडकर और वर्तमान
- हे गांधी, कशातच राम नाही!
- मुहाजिर
- महात्मा फुले का बहुजनवाद
- जावेद पाशा की पक्तियाँ
- शिवाजी महाराज और मुस्लिम
- पैलुखां च्या घरात!
- चीत्कार
- सिर्फ शोर नहीं हूँ!
- डॉ. आम्बेडकर और लोकशाही
- बहुजनांचे मुस्लिम होण्याचे वास्तव
- मुस्लिम ब्रम्हनवाद
- बहुजनांचा धर्म इस्लाम
- स्वातंत्र्याचे मढ़े (नाटक)
- लादेन अभी जिंदा है (नाटक)
- जावेद पाशा के पथनाट्य
सन्मान
- अध्यक्ष पहिले राज्यस्तरिय फुले-आम्बेडकरी साहित्य संमेलन (2009, कुर्ली, जिल्हा यवतमाळ)
- अध्यक्ष - पाहिले बहुजन युवा साहित्य संमेलन, गड़चिरोली 2010)
- आमंत्रक - पहिले राज्यस्तरीय समतेसाठी सूफी-संत साहित्य संमेलन, वरोरा, जिला चंद्रपूर, 2011
- अध्यक्ष - अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, 2012, सांगली
- अध्यक्ष - सावित्री-फातिमा विचार संगीति संमेलन, 20017 नागपूर
- अध्यक्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, अकोला 2018
- अध्यक्ष - सहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन (२०१८)[४]
याव्यतिरिक्त इतर ५ संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
- ^ "Jawed Qureshi Allias Prof. Jawed Pasha(Independent(IND)):Constituency- Wani(YAVATMAL) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2019-01-06 रोजी पाहिले.
- ^ "मुस्लिम आरक्षण पर पुणे में १३ को प्रतिनिधिक सभा - Nagpur Today Hindi". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2019-01-06 रोजी पाहिले.
- ^ "'Qureshi's books reflect ills of present-day society' - Times of India". The Times of India. 2019-01-06 रोजी पाहिले.
- ^ "संतांची मांडणी कृतीत आणने गरजेचे - जावेद पाशा कुरेशी". Eenadu English Portal. 2019-01-06 रोजी पाहिले.[permanent dead link]