Jump to content

जावा चिमणी

जावा चिमणी

जावा चिमणी (इंग्लिश:Java Sparrow) हा एक पक्षी आहे.

या पक्ष्याची चोच मोठी व लाल असते. तसेच डोके व कंठ काळा असतो. डोक्याच्या दोन्ही बाजूंना पांढरा पट्टा असतो.शेपटीचा रंग काळा, पोटाचा रंग शरबती व शेपाटीखालील भाग पांढरा असतो.

वितरण

हे पक्षी बाहेरून आणून सोडण्यात आले आहेत. कोलंबोत या पक्ष्यांनी वसाहत केली आहे. कोलकाता आणि चेन्नईजवळ स्थायिक झालेले आढळून येतात.

निवासस्थाने

हे पक्षी भातशेती, बागा आणि देवनळांची बेटे या ठिकाणी राहतात.

संदर्भ

  • पक्षीकोश- मारुती चितमपल्ली