जाळगेवाडी
?जाळगेवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उब्रंज,पाटण |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्री.शिवाजी बबन काटे |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
जाळगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.पुणे- बंगलोर या महामार्गावर उब्रंज गाव आहे,त्या गावापासुन पश्चिमेला पंधरा किमी अंतरावर हे गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.कडक उन्हाळ्यात सुद्धा येथील तळीच्या कड्यावर रात्रीच्या वेळी महाबळेश्वर सारखे तापमाण असते.डोंगराच्या पायथ्याला गाव असल्याने थंडीत देखिल उबदारपणा जाणवतो.
लोकजीवन
येथिल लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.पशुधनाच्या बाबतीत चाफळ पंचक्रोशीत गावाचा नंबर होता.आधुनिक शेतीचा अंगिकार केल्याने आता पशुधन कमी झालेले आहे.नवीन पिढी नोकरीसाठी शहरी भागात वास्तव करीत आहे,पण गावाशी नाळ मात्र अद्याप तरी जोडलेली आहे.अन्य ठिकाणी खेडी ओस पडत आहेत,पण या गावात कुलुपबंद घर अपवादात्मक आहे.शेती आणि नोकरी यांचा मेळ घातला गेल्याने लोकांचे जीवनमान सुधारत आहे.
प्रेक्षणीय स्थळे
जानाईमाता मंदिर,मारुती मंदिर,महादेव मंदिर,जोतिबा मंदिर,आड आणि आडावरील रहाट.
नागरी सुविधा
आसपासच्या गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते आहेत.इ.सातवी पर्यन्त शाळा आहे.पोस्ट आहे.एस्.टी.ची सोय आहे.
जवळपासची गावे
दक्षिणेला माथनेवाडी,चाफळ,गमेवाडी पश्चिमेला कवठेकरवाडी,सुर्याचीवाडी,उत्तरेला चव्हाणवाडी.पुर्वेला भला मोठा डोंगर. याला जंगला असे म्हणतात.