जार्मो
जार्मो |
---|
जार्मो हे उत्तर इराकमधील झाग्रोस पर्वतानजीक असलेले एक पुरातत्त्वीय ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खननात नवाश्मयुगीन आद्य शेतकरी वसाहतीचे अवशेष उजेडात आले.
उत्खनन
इराकी पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट ब्रेडवुड यांनी जार्मो येथे इ.स. १९४८ ते इ.स. १९५५ या कालावधीत एकूण तीन सत्रांत शास्त्रीय पद्धतीने उत्खनन केले.[१] प्रा. ब्रेडवुड यांनी साधारणपणे ३ ते ४ एकराचा परिसर उत्खनित केला. या उत्खननातून मिळालेल्या वस्तूंचा कालखंड कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीने इ.स.पूर्व ७०९० ते इ.स.पूर्व ४९५० असा निश्चित करण्यात आला. याठिकाणी २५ चौरसाकृती बांधलेल्या मातीच्या घराचे अवशेष सापडले. जार्मो येथे गाय, बैल, डुक्कर, कुत्रा, गाढव यांची हाडेही सापडली. या वसाहतीत १५० लोक राहत असावेत असा निष्कर्ष प्रा. ब्रेडवुड यांनी लावला. जार्मो येथे गहू व बार्ली मोठ्या प्रमाणात जळालेल्या स्वरूपात सापडल्याने येथूनच शेतीची प्रथा इतरत्र पसरली असावी असे मत मांडले जाते.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ एल.एस. ब्रेडवूड. "प्री-हिस्टाॅरिक आर्किॅआॅलॉजी अलॉंग द झाग्रोस फ्लॅन्क्स" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2013-10-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ जून इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ रॉबर्ट ब्रेडवूड. "द ॲग्रीकल्चरल रिव्होल्यूशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2014-11-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ जून, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)