जामनेर
?जामनेर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • २५८.८९५ मी |
जिल्हा | जळगाव |
जामनेर येथे पाचोरा ते जामनेर मिनी रेल्वे सेवा चालू आहे जामनेर हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
जामनेर शहर कापूस, केळी, आणि संत्री, करता प्रसिद्ध आहे. जामनेर शहर हे जळगाव शहरापासून ३७ कि.मी. अंतरावर आहे.आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पासून फक्त ३७ कि.मी . अंतरावर आहे. जामनेर तालुक्याचे आमदार श्री. गिरिश महाजन आहेत.जामनेर शहर हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.हे शहर [छत्रपती संभाजीनगर]] बुरहानपुर महामार्गावर आहे.
जवळचे विमानतळ : जळगाव.
जवळचे रेल्वे स्थानक : जामनेर, पाचोरा, जळगाव, भुसावळ जंक्शन.
दि. २८ मे १४९० रोजी जामनेर शहर स्थापन करण्यात आले.
मुघलकाळापासून येथे अस्तित्व आहे.
'जामेहनुर' या वरून जामनेर असं नाव पडल्याची मुघलकालीन पत्रव्यवहारात नोंद आढळते.
जामाची मेर ( मळा ) म्हणून जामनेर काहींच्या मते कांगनेर ( कांग नदी काठावरील महाल ) यावरून जामनेर महाल म्हणजे आताच्या भाषेत महसुली केंद्र अर्थात मंडल वा सर्कल . पूर्वी तर्फ , महाल , कसबा , पेठ , परगणा , खुर्द , बुद्रुक अशा वस्त्या होत्या . उदा . जामनेर तालुक्यातील वाकडी तर्फ यात हिवरखेडेत . वा ., चिंचखेडेत . वा . ही गावे २ ) जामनेर महालात हिवरखेडे बु०॥ , चिंचखेडे बु ०॥ . ३ ) चिंचोली कसब्यात पिंप्री (कसबा ) , चिंचोली ( कसबा ) ४ ) नाशिराबाद परगण्यात , कुऱ्हे ( प्र . न . ) , गाडेगाव ( प्र . न . ) ५ ) नदीच्या अल्याड व नदीच्या पल्याड एकाच नावाची दोन गावे असल्यास , त्यांच्या लोकसंख्येवरून जास्त लोकसंख्येच्या गावाला बुद्रुक तर कमी लोकसंख्येच्या गावाला खुर्द म्हणत असत . जसे_ ओझर बु०॥ , ओझर खु ०॥ . ६ ) कसबी कारागिरांच्या व शेतकऱ्यांच्या वस्तीला कसबा म्हणत जसे - पहूर कसबे या गावात रंगारी , सुतार , सोनार , कुंभार , माळी या कारागीर व कास्तकारांची वस्ती अधिक . त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून आकर्षक व सुंदर वस्तु बनवाव्यात व जीथे बाजारपेठ अस्तीत्वात असेल तीथे नेऊन विकायचे . यावरून पेठ अस्तीत्वात आल्या. पेठ वसवण्याचं काम सरकारने नेमलेले वतनदार म्हणजे शेट्ये व महाजन करत असत . म्हणून पहूर पेठ अस्तीत्वात आले . ७ ) काही गावांना तिथल्या भौगोलिक वैशिष्टयांवरून नावं मिळाली . जसे -भरपूर पिंपळाची झाडे - पिंपळगाव , वडाची झाडे -वडगाव, बोरीची झाडे -बोरगाव यातील एकाच नावाची अनेक गावे आहेत , त्यांना ग्रामदैवतांवरून किंवा त्या गावच्या कर्तबगार व्यक्तीच्या किंवा एखाद्या वैशिष्टयपूर्ण देवतांच्या नावावरून ओळखले जाऊ लागले . जसे -पळासखेड ( मिराचे ) , पळासखेड ( काकर ) , पळासखेड ( मोगलाई ) आता त्याला महानोरांचे म्हणतात , पिंपळगाव ( हरेश्वर ) , पिंपळगाव ( गोलाईत ) , पिंपळगाव ( रेणूका ई ) असा गावांचा एकंदरीत इतिहास आहे कर्तबगार व्यक्ती किंवा कूळ यावरून काही गावे ओळखली जातात . जसे मांडवे ( धोब्याचे ) , मांडवे ( कोळ्याचे ) , पळसखेड ( सपकाळ ) .पळसखेड ( गुजराचे )
जामनेर तालुका हा खुप विस्तारलेला आहे, नेरी पासून ते तोंडापूर,पर्यंत विविध गावे ही जामनेर मतदारसंघात येतात, तालुक्यातील शेंदुर्णी हे एक नगरपंचायत चे शहर आहे आषाढी एकादशीचा उत्सव इथं मोठ्या प्रमाणात असतो, त्याच बरोबर फत्तेपूर,तोंडापूर, देऊळगाव,नेरी,कापुसवाडी असे मोठे गावे जामनेर मध्ये येतात.कापुसवाडी इथं सुर नदीवर धरण प्रकल्प मोठा आहे.
जामनेर तालुक्यातील पोस्ट कार्यालये (पिन कोड सहित)
- शेंदुर्णी : ४२४२०४
- पहूर : ४२४२०५
- जामनेर : ४२४२०६
- वाकडीः ४२४२०७
- फत्तेपुर : ४२४२०९
- नेरी : ४२५११४