जानेवारी ६
जानेवारी ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६ वा किंवा लीप वर्षात ६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
सतरावे शतक
- १६६४ - मराठी सैन्य सुरतेत शिरले.
- १६६५ - शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर येथे जिजाबाई व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
- १६७३ - कोंडाजी फर्जंद यांनी ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकला.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८३२ - बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे दर्पणचा पहिला अंक प्रकाशित केला.
- १८३८ - सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.
विसावे शतक
- १९२४ - वि.दा. सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून जन्मठेपेतून सुटका.
- १९२९ - मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
- १९०७ - मारिया माँटेसोरी यांनी पहिली माँटेसोरी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
- १९१२ - न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.
- १९२९ - मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
- १९४४ - दुसरे महायुद्ध – सोवियेत सैन्य पोलंडमध्ये शिरले.
- १९९३ - सोपोर हत्याकांड - अतिरेक्यांनी छावणीवर केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारतीय सीमा सुरक्षा दळाच्या जवानांनी ५५ काश्मिरी नागरिकांची हत्या केली.
एकविसावे शतक
जन्म
- १४१२ - संत जोन ऑफ आर्क.
- १७४५ - ऐलियन मॉंटगोल्फिएर बलूनच्या साहाय्याने आकाशात जाण्याचे प्रयोग करणारा.
- १८१२ - बाळशास्त्री जांभेकर – दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे आणि दिग्दर्शन या मासिकाचे प्रकाशक.
- १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज.
- १९२५ - रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
- १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक
- १९३१ - डॉ. आर.डी. देशपांडे, मराठी पर्यावरणशास्त्रज्ञ.
- १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. भारतीय क्रिकेट संघनायक, समालोचक व प्रशिक्षक.
- १९६६ - ए.आर. रहमान, भारतीय संगीतकार.
मृत्यू
- १७९६ - जिवबा दादा बक्षी, महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी.
- १८४७ - त्यागराज, दाक्षिणात्य संगीतकार
- १८५२ - लुई ब्रेल, अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक.
- १८८५ - भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मानले जाणारे हिंदी साहित्यिक.
- १९१९ - थियोडोर रूझवेल्ट अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष.
- १९७१ - प्रफुल्लचंद्र तथा पी.सी. सरकार, भारतीय जादूगार.
- १९८४ - विद्यानिधी महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार.
- १९८७ - जयदेव , हिंदी चित्रपट संगीतकार.
- २०१० - प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक
- २०१७ - ओम पुरी, हिंदी अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- पत्रकार दिन (महाराष्ट्र).
- वर्धापनदिन : मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण (१८३२)
संदर्भ
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - (जानेवारी महिना)