जानेवारी ४
जानेवारी ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४ वा किंवा लीप वर्षात ४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
नववे शतक
- ८७१ - रीडिंगची लढाई - वेसेक्सचा एथेलरेड डेन्मार्कच्या आक्रमकांकडून पराभूत[१].
पंधरावे शतक
- १४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला.
सतरावे शतक
- १६४२ - इंग्लिश गृहयुद्ध - चार्ल्स पहिल्याने ब्रिटिश संसदेवर हल्ला केला.
अठरावे शतक
- १७१७ - नेदरलँड्स, इंग्लंड व फ्रान्सने तिहेरी तह केला.
- १७६२ - इंग्लंडने स्पेन व नेपल्स विरुद्ध युद्ध पुकारले.
एकोणिसावे शतक
- १८४७ - सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हाॅल्व्हर पिस्तूल विकले.
- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
- १८८५ डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रँट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर आंत्रपुच्छ काढून टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली.
- १८९६ - युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले.
विसावे शतक
- १९२६ - लखनौ येथे भारतीय क्रांतिकारकांवर काकोरी खटल्याच्या सुनावणीस सुरुवात.
- १९४४ - अॅडोल्फ हिटलरने जर्मनीतील १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करून घेण्याबद्दलचा वटहुकूम काढला.
- १९४८ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.
- १९५१ - कोरियन युद्ध - चीन व उत्तर कोरियाच्या सैन्याने सेऊल काबीज केले.
- १९५२ - ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
- १९५४ - मेहेरचंद महाजन भारताच्या सरन्यायाधीशपदी.
- १९५८ - स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
- १९५८ - एडमंड हिलरी दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
- १९५९ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.
- १९६२ - न्यू यॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
- १९६४ - वाराणसी येथे भारतातील पहिले डिझेल रेल्वे इंजिन येथे तयार झाले.
- १९७४ - अमेरिकेची सेनेटच्या वॉटरगेट समितीने मागितलेली कागदपत्रे देण्यास अध्यक्ष रिचर्ड निक्सनने नकार दिला.
- १९८९ - अमेरिकन नौदलाच्या २ एफ.१४टॉमकॅट विमानांनी लिबियाची २ मिग २३ फ्लॉगर विमाने पाडली.
- १९९० - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
- १९९६ - चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार.
- १९९९ - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका शिया मशिदीवर नमाजादरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.
एकविसावे शतक
- २००४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या अध्यक्षपदी.
- २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.
- २००७ - नान्सी पेलोसी अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली.
- २०१० - बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे दुबईमध्ये उद्घाटन झाले.
जन्म
- १०७६ - झ्हेझॉॅंग, सॉंग वंशाचा चिनीसम्राट.
- १६४३ - सर आयझॅक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १८०९ - लुई ब्रेल दृष्टिहीनांसाठी 'ब्रेल लिपी' तयार करणारा.
- १८१३ - आयझॅक पिट्समन लघुलिपी(शॉर्टहॅंड) तयार करणारा.
- १८४८ - कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान.
- १९०० - जेम्स बॉंड, अमेरिकन पक्षीिास्त्रज्ञ.
- १९०९ - प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.
- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री.
- १९२४ - विद्याधर गोखलेनाटककार,खासदार,लेखक संपादक.
- १९२५ - प्रदीप कुमार, हिंदी व बंगाली चित्रपटअभिनेता.
- १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४० - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
- १९४१ - कल्पनाथ राय, केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते.
- १९५३ - जॉर्ज टेनेट, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, सी.आय.एचा प्रमुख.
मृत्यू
- १२४८ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १५६४ - होसोकावा उजित्सुना, जपानी सेनापती.
- १६९५ - फ्रांस्वा हेन्रि दि मोंतमोरेंसी-बुतेव्हिल, फ्रान्सचा सेनापती.
- १८३१ - जेम्स मन्रो, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.
- १८७७ - कोर्नेलियस व्हान्डरबिल्ट, अमेरिकन उद्योगपती.
- १९०७ - गोवर्धनराम त्रिपाठी 'सरस्वतीचंद्र' या गुजराती कादंबरीचे लेखक.
- १९०८ - राजारामशास्त्री भागवत विचारवंत व संस्कृत पंडित.विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दुधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.
- १९६५ - टी.एस.इलियट, अमेरिकन साहित्यिक.
- १९९४ - राहुल देव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार
- २००६ - मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम, दुबईचा शेख वसंयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन
- स्वातंत्र्यदिन : म्यानमार (१९४८)
संदर्भ
जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - (जानेवारी महिना)
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)