जानेवारी २८
ठळक घटना
एकोणिसावे शतक
- १८४६ - सर हॅरी स्मिथच्या ब्रिटिश सैन्याने अलीवालची लढाई जिंकली.
विसावे शतक
- १९३२ - दुसऱ्या महायुद्धात जपानने शांघाय काबीज केले.
- १९८६ - अंतराळ शटल(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.
- १९९९ - देशिकोत्तम हा विश्वभारती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना प्रदान.
- २००० - इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणाऱ्या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन.
एकविसावे शतक
- २००२ - टी.ए.एम.ई. फ्लाइट १२० हे बोईंग ७२७-१०० प्रकारचे विमान कोलंबियाच्या दक्षिण भागात अँडीझ पर्वतरांगेवर कोसळले. ९२ ठार.
- २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
जन्म
- १४५७ - सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.
- १८६५ - लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.
- १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.
- १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.
- १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.
- १९८१ - एलायजाह वूड, अमेरिकन अभिनेता.
मृत्यू
- ८१४ - शार्लमेन, ब्रिटिश क्रांतिकारी.
- १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९८६ - स्पेस शटल चॅलेंजरचे प्रवासी
- ग्रेग जार्व्हिस
- क्रिस्टा मॅकऑलिफ
- रोनाल्ड मॅकनेर
- एलिसन ओनिझुका
- ज्युडिथ रेसनिक
- फ्रांसिस आर. स्कोबी
- मायकेल जे. स्मिथ
- १९८९ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.
- १९९६ - बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.
- १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
जानेवारी २६ - जानेवारी २७ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३०