जानेवारी २४
जानेवारी २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४ वा किंवा लीप वर्षात २४ वा दिवस असतो.
ठळक घटना
पहिले शतक
- ४१ - रोमन सम्राट कालिगुलाला त्याच्याच प्रेटोरियन रक्षकांनी मारले.
- ४१ - कालिगुलानंतर क्लॉडियस रोमन सम्राट झाला.
पंधरावे शतक
- १४३८ - बासेलच्या समितीने पोप युजेनियस चौथ्याला निलंबित केले.
- १४५८ - मॅथियस कॉर्व्हिनस हंगेरीच्या राजेपदी.
सतरावे शतक
- १६२४ - ग्रेगोरी पंधराव्याने आल्फोन्सो मेन्देझला इथियोपियाचा मुख्य धर्मप्रसारक केला. मेन्देझ या दिवशी गोव्याहून मासावा, इथियोपिया येथे पोचला.
- १६७९ -इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसऱ्याने संसद बरखास्त केली.
अठरावे शतक
- १७४२ -चार्ल्स सहावा आल्बर्ट पवित्र रोमन सम्राटपदी.
एकोणिसावे शतक
- १८४८ -कॅलिफोर्नियात जेम्स डब्ल्यु. मार्शलला सटर्स मिल येथे ओढ्यात सोने सापडले. यानंतर जगभरातून अभूतपूर्व गर्दी सोने मिळवायला कॅलिफोर्नियात लोटली.
विसावे शतक
- १९०८ -रॉबर्ट बाडेन-पॉवेलने बॉय स्काउट्स सुरू केले.
- १९२४ -सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून लेनिनग्राड करण्यात आले.
- १९३६ -आल्बेर सराउ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४३ -दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट व इंग्लिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी कॅसा ब्लांका येथील परिषद आटोपली.
- १९४५ -दुसरे महायुद्ध - रशियन सैन्याने ऑश्विझ कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला.
- १९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा.
- १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.
- १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.
- १९८७ - लेबेनॉनमध्ये अतिरेक्यांनी अलान स्टीन, जेसी टर्नर, रॉबर्ट पॉलहिल व मिथिलेश्वर सिंग यांचे अपहरण केले.
एकविसावे शतक
जन्म
- ७६ - हेड्रियान, रोमन सम्राट.
- १७१२ - फ्रेडरिक दुसरा, प्रशियाचा राजा.
- १८९१ - अलेक केनेडी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - ई.ए. स्पायसर, अमेरिकन बायबलतज्ञ.
- १९०७ - डेनिस स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - मार्क बर्मेस्टर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - नील जॉन्सन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ४१ - कालिगुला, रोमन सम्राट.
- ७७२ - पोप स्टीवन चौथा.
- ११२५ - डेव्हिड चौथा, जॉर्जियाचा राजा.
- १३६६ - अरागोनचा आल्फोन्सो चौथा.
- १९६५ - विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान.
- १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९३ - थर्गुड मार्शल, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
- २०११ - पंडित भीमसेन जोशी, भारतीय शास्त्रीय गायक.
प्रतिवार्षिक पालन
- शारीरिक शिक्षण दिन
- राष्ट्रीय बालिका दिवस
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २२ - जानेवारी २३ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - (जानेवारी महिना)