जानेवारी २१
जानेवारी २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१ वा किंवा लीप वर्षात २१ वा दिवस असतो.
ठळक घटना
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
- १७६१ - थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
- १७९३ - फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
एकोणविसावे शतक
- होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
विसावे शतक
- १९५४ - नॉटिलस या अणुउर्जेवर चालण्याऱ्या जगातील पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
- १९६१ - इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबरा यांची पहिली भारतभेट.
- १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- १९९९ - जर्मन सरकारच्या 'फोरम ऑफ आर्ट ॲन्ड एक्झिबिशन' ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
- २००० - फायर ॲंन्ड फरगेट या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.
एकविसावे शतक
- २००३ - राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
जन्म
- १८८२ - वामन मल्हार जोशी, मराठी साहित्यिक आणि तत्त्वचिंतक.
- १८९४ -माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार.
- १८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार.
- १९१० - शांताराम आठवले, मराठी चित्रपटदिग्दर्शक आणि साहित्यिक
- १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.– माजी रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ज्ञ
- १९५३ - पॉल अॅलन, मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक.
मृत्यू
- १९२४ - व्लादिमिर लेनिन, रशियन क्रांतिकारक.
- १९४३ - क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली
- १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते.
- १९५० - एरिक ब्लेर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल, इंग्लिश साहित्यिक.
- १९६५ - हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
- १९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल. भारताचे ९ वे नौदल प्रमुख.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - जानेवारी २३ - (जानेवारी महिना)